• Download App
    कम्युनिस्टांप्रमाणे कॉँग्रेस विचारसरणीही धोकादायक,या संदर्भातूनच कॉँग्रेसमुक्त भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल|Like the Communists, the Congress ideology is as dangerous, In this context, Congress-free India, Prime Minister Narendra Modi's attack

    कम्युनिस्टांप्रमाणे कॉँग्रेस विचारसरणीही धोकादायक,या संदर्भातूनच कॉँग्रेसमुक्त भारत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशात आज कम्युनिस्ट पक्ष केवळ केरळमध्येच सत्तेत आहे, मात्र ती विचारसरणी अतिशय धोकादायक आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस आज केवळ ६० जागांपुरता मर्यादित पक्ष असला, तरीही त्यांची विचारसरणीही धोकादायक आहे. त्यामुळे यासंदभार्तून काँग्रेसमुक्त भारत या संकल्पनेककडे पाहिले पाहिजे, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.Like the Communists, the Congress ideology is as dangerous, In this context, Congress-free India, Prime Minister Narendra Modi’s attack

    एएनआय या वृत्तसंस्थेस दिलेल्या मुलाखतीत बोलताना मोदी म्हणाले, काँग्रेसमुक्त भारत ही संकल्पना केवळ काँग्रेसच्या संख्याबळापुरती मर्यादित नाही. देशात आज कम्युनिस्ट पक्ष मृतप्राय झाला असून केवळ केरळमध्येच ते सत्तेत आहेत. मात्र, ती विचारसरणी अतिशय धोकादायक आहे. अगदी तसेच काँग्रेसचे आहे.



    देशातील आजपर्यंतच्या पंतप्रधानांपैकी मी आणि अटलजी वगळता अन्य सर्व काँग्रेस स्कूलमधील होते. त्यामुळे देशातील राजकारणामध्ये अद्यापही काँग्रेसी कार्यशैली आणि विचारसरणी म्हणजेच भ्रष्टाचार, जातीयतावाद, प्रांतवाद, फुटीरतावाद याचे प्राबल्य आहे. त्यामुळे देशातून ही सर्व संपुष्टात आणायचे असल्यास काँग्रेसमुक्त भारत गरजेचे आहे.

    देशात निवडणूक होणाºया पाच राज्यांमध्ये भाजपची प्रचंड मोठी लाट असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, पाचही राज्यांमध्ये भाजप आपल्या विकासाच्या राजकारणाच्या बळावर मतदारांपुढे जात आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळणार, यात कोणतीही शंका नाही. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विकासाच्या राजकारणाचा नवा पायंडा निर्माण केला आहे.

    उत्तर प्रदेशातील जनतेने भाजपला २०१४, २०१७ आणि २०१९ साली भरघोस यश दिले आहे, त्याचीच पुनरावृत्ती २०२२ मध्ये होईल. पंजाबमध्ये भाजपच्या नेत्यांनी त्याकाळची परिस्थिती पाहून पक्षाचा स्वार्थ बाजुला ठेवला. त्यावेळी पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करणे आणि हिंसाचार रोखणे अत्यंत गरजेचे होते.

    त्यामुळे आमच्या नेत्यांनी त्यावेळी पक्षाचे नुकसान होऊ देऊन राष्ट्रहितास प्राधान्य दिले होते. मात्र, आज पंजाबमध्ये भाजप सर्वांत विश्वसनिय पक्ष म्हणून उदयास आला आहे. त्याचप्रमाणे कॅप्टन अमरिंदर सिंग आणि ढिंढसा यांच्यासारखे मोठे नेते भाजपसोबत आहेत, त्यामुळे पंजाबमध्येही भाजप यश मिळवेल; असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

    देशातील बहुतांशी प्रसारमाध्यमे एकांगी वार्तांकन करतात. जणुकाही केवळ हिंदू धर्मांतच जाती असल्याचे भासविले जाते. मात्र, गुजरातमध्ये तर मुस्लिम धमार्तील काही जाती ओबीसी प्रवर्गात येतात. तसेच अन्यही आहेत. मात्र, वार्तांकन करताना केवळ हिंदू धर्मांतील जातींना धरूनच केले जाते, असा आरोपही मोदी यांनी केला.

    Like the Communists, the Congress ideology is as dangerous, In this context, Congress-free India, Prime Minister Narendra Modi’s attack

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त