• Download App
    साकीनाक्यापासून पुणे, परभणी - भिवंडीपर्यंत महिलांवर बलात्कार; ठाकरे - पवार सरकार आणि राज्यपाल यांच्यात मात्र "लेटर वॉर" |Letter war erupted between governor Bhagat Singh Koshiyari and CM Uddhav Thackeray over women safety in Maharashtra

    साकीनाक्यापासून पुणे, परभणी – भिवंडीपर्यंत महिलांवर बलात्कार; ठाकरे – पवार सरकार आणि राज्यपाल यांच्यात मात्र “लेटर वॉर”

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : साकीनाकापासून पुणे, परभणी भिवंडी पर्यंत महिला असुरक्षित आहेत. रोज बलात्काराच्या महाराष्ट्रभरातून बातम्या येत आहेत आणि त्यावरून ठाकरे – पवार सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यात “लेटर वॉर” सुरू झाले आहे.Letter war erupted between governor Bhagat Singh Koshiyari and CM Uddhav Thackeray over women safety in Maharashtra

    राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी महाराष्ट्रातील महिला सुरक्षा या विषयावर विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे असे निर्देश देणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले. त्यामध्ये राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी घेतला.


    प्रकरण फारच अंगलट येतेय म्हटल्यावर सुप्रिया सुळे बोलल्या… साकीनाक्याच्या घटनेवरून राजकारण नको…!!


     

    परंतु, त्यावरूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पत्रोत्तर देऊन आपणच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारकडे चार दिवसांचे संसदेचे अधिवेशन बोलवावे अशी मागणी करावी म्हणजे त्यात साकीनाका बलात्कारासह सर्व देशभरातील महिला सुरक्षेवर चर्चा करता येईल अशी खोचक सूचना केली आहे.

    महाराष्ट्रात साकीनाका, परभणी, भिवंडी, पुणे येथे बलात्काराच्या आणि हत्येच्या घटना पुढे आल्यात. यावरून राज्यपालांनी ठाकरे – पवार सरकारला विशेष अधिवेशन घेण्याची सूचना केली होती.

    परंतु, ठाकरे – पवार सरकारने राज्यपालांवर ते भाजप धार्जिणे असल्याचा आरोप लावून विरोधी पक्ष विधिमंडळ अधिवेशनाची मागणी करत असताना राज्यपालांनी घटनात्मक प्रमुखपदावर राहूनराजकीय भूमिका घेत विरोधकांच्या सुरात सूर मिसळणे गैर आहे,

    असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात केला आहे. यावर आता राज्यपाल भगतसिंह कोशियारी कोणत्या पद्धतीची कायदेशीर कारवाई करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    Letter war erupted between governor Bhagat Singh Koshiyari and CM Uddhav Thackeray over women safety in Maharashtra

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार