वृत्तसंस्था
जम्मू – काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदारसंघांची फेररचना करण्याचे कामकाज आज सुरू होत आहे. मतदारसंघ फेररचना आयोगाचे अधिकारी श्रीनगरमध्ये दाखल झाले असून ते केंद्रशासित प्रदेशातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत. Leaders of BJP, Congress, CPI, CPI (Marxist), BSP, National Conference, Panthers Party, J&K People’s Conference & J&K Apni Party to meet Delimitation Commission in Srinagar today; no meeting with PDP leaders scheduled
आजच्या चर्चेमध्ये भाजप, काँग्रेस, नॅशनल कॉफरन्स, सीपीएम, सीपीआय, बहुजन समाज पक्ष, पँथर्स पार्टी, जम्मू – काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स, आपनी पार्टी या पक्षांचे प्रतिनिधी सामील होणार असल्याचे अधिकृत सांगण्यात आले. आजच्या शेड्यूलमध्ये मेहबूबा मुफ्तींचा पक्ष पीडीपीचा प्रतिनिधी हजर राहण्याचा उल्लेख नाही.
जम्मू – काश्मीरमध्ये ३७० कलम पुन्हा बहाल करावे, संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा, यासाठी सर्व काश्मीरी पक्ष आग्रही असले, तरी काँग्रेसने ही मागणी सोडून दिली आहे. काँग्रेसच्या ५ मागण्यांमध्ये ३७० च्या बहालीचा उल्लेख नाही. फक्त राज्याच्या दर्जाचा उल्लेख आहे. बाकीच्या पक्षांनी आपल्या मागण्यांचा सूर थोडा कमी केला आहे. पण मेहबूबा मुफ्तींची पीडीपी मात्र ३७० आणि राज्याच्या दर्जावर हटून बसली आहे. जोपर्यंत या दोनही गोष्टी होत नाहीत तोपर्यंत निवडणूक लढवायची नाही, यावर मेहबूबा मुफ्ती ठाम आहेत. त्यामुळे त्यांचा पक्ष मतदारसंघ फेररचनेच्या प्रक्रियेत सामील होणार नसल्याची चिन्हे आहेत.
अर्थात पीडीपीने तशी अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. पंतप्रधानांसमवेत झालेल्या सर्व पक्षीय बैठकीत मेहबूबा मुफ्तींनी आपल्या दोन्ही मुद्द्यांचा आग्रह धरला होता. काश्मीर खोऱ्यातल्या अडीच ते तीन जिल्ह्यांमध्येच प्रभाव क्षेत्र असल्याने मेहबूबांसाठी अशी ताठर भूमिका घेणे political compulsion मानले जात आहे. पण त्यातून पाकिस्तान धार्जिणीही भूमिक दिसून येते.
Leaders of BJP, Congress, CPI, CPI (Marxist), BSP, National Conference, Panthers Party, J&K People’s Conference & J&K Apni Party to meet Delimitation Commission in Srinagar today; no meeting with PDP leaders scheduled
महत्त्वाच्या बातम्या
- सभागृहात गोंधळ, तालिका अध्यक्षांशी गैरवर्तन प्रकरणात भाजपच्या १२ आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन
- Mansoon Session 2021 : विधानसभेत तुफान गदारोळ; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, वाचा सविस्तर…
- महाविकास आघाडीचे नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाहीत; प्रताप सरनाईक मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर ठाम
- स्टॅन स्वामींचे निधन, भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी वर्षभरापूर्वी झाली होती अटक