largest corona outbreak in India : देशात दररोज आढळणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आधीचे सर्व विक्रम मोडत आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 217,353 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1185 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तथापि, याच काळात कोरोनातून 1,18,302 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 200,739 नवीन रुग्ण समोर आले होते. गतवर्षी 30 सप्टेंबर रोजी देशात अकराशेहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला होता. largest corona outbreak in India, 2.17 lakh new patients in 24 hours, 1185 deaths
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात दररोज आढळणारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही आधीचे सर्व विक्रम मोडत आहे. आज देशात पहिल्यांदाच सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 217,353 नवीन कोरोना रुग्ण आढळले असून 1185 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तथापि, याच काळात कोरोनातून 1,18,302 जण बरेही झाले आहेत. यापूर्वी बुधवारी 200,739 नवीन रुग्ण समोर आले होते. गतवर्षी 30 सप्टेंबर रोजी देशात अकराशेहून अधिक बाधितांचा मृत्यू झाला होता.
देशातील कोरोनाची स्थिती
एकूण कोरोना रुग्ण – 1 कोटी 42 लाख 91 हजार 917
एकूण बरे झालेले – 1 कोटी 25 लाख 47 हजार 866
एकूण सक्रिय रुग्ण – 15 लाख 69 हजार 743
एकूण मृत्यू – 1 लाख 74 हजार 308
एकूण लसीकरण – 11 कोटी 72 लाख 23 हजार 509 डोस दिले
कुंभमेळ्यातून निरंजनी आखाड्याची माघार
हरिद्वार कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या संतांच्या 13 आखाड्यांपैकी एक असलेल्या निरंजन आखाड्याने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बिघडणारी परिस्थिती पाहून कुंभमेळ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. निरंजनी आखाड्याचे सचिव रवींद्र पुरी म्हणाले की, “मुख्य शाही स्नान 14 एप्रिल रोजी मेष संक्रांतीच्या वेळी संपन्न झाले. आमच्या आखाड्यात अनेकांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहे. अशा परिस्थितीत आमच्यासाठी कुंभमेळा पूर्ण झाला आहे.”
दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार कुंभमेळ्याचा कालावधी कमी करून अवघ्या एका महिन्यावर आणण्यात आला होता. सर्वसाधारणपणे दर 12 वर्षांनी घेण्यात येणारा कुंभमेळा जानेवारीच्या मध्यापासून एप्रिलपर्यंत चालतो.
महाराष्ट्रातील परिस्थिती सर्वात चिंताजनक
काल महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे 61,695 नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण रुग्णांची संख्या, 36,39,855 वर पोहोचली आहे. या महामारीमुळे आणखी 349 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृतांचा एकूण आकडा 59,153 वर पोहोचला आहे. कोरोना रुग्णांचा हा एका दिवसात आढळलेला दुसरा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी 63,294 रुग्ण आढळले होते.
largest corona outbreak in India, 2.17 lakh new patients in 24 hours, 1185 deaths
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोना संसर्गानंतर रुग्णाच्या रक्तामध्ये गाठी होण्याचा मोठा धोका ; तज्ज्ञाचा इशारा
- पुण्याचा टेस्ट पॉॅझिटिव्हीटी रेट झाला कमी ; 30 टक्क्यांवरून प्रमाण घसरले 21 टक्क्यांवर
- ससूनमधील बेडची संख्या आचानक वाढविली , निवासी डॉक्टरांचा काम बंदचा इशारा ; मनुष्यबळ आणखी वाढविण्याची मागणी
- रामायण पाहण्याचा आनंद आता पुन्हा छोट्या पडद्यावर लुटा
- MAHARASHTRA CORONA : दिलासादायक ! परळी थर्मलमधील ऑक्सिजन प्लांट थेट अंबाजोगाईला ; दर तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मिती