विशेष प्रतिनिधी
दिल्ली : लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या विरूध्द काँग्रेस पक्षातील सात सदस्यांची समिती उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी, प्रियांका गांधी, के सी वेणुगोपाल, ए के अॅन्टोनी, गुलाम नवी आझाद, अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खारगे हे सात सदस्य रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यास जाणार आहेत.
Lakhimpur Kheri violence case, a seven-member Congress delegation will meet the President tomorrow
१३ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ११.३० वाजता ही भेट घेण्याचे ठरले आहे. या भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाकडून ‘मेमोरॅण्डम ऑफ अंडरस्टँडिंग’ देखील सबमिट करण्यात येणार आहे.
लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांवरील हिंसाचाराच्या विरोधात संपूर्ण देशातून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. याच प्रकरणात काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियांका गांधी यांनीदेखील तीव्र शब्दांमध्ये निंदा केली होती. अतिशय शांततेमध्ये शेतकरी आंदोलन करत असताना, मागून भरधाव वेगाने गाडी येते आणि शेतकर्यांना अमानुषपणे मारून टाकते. अशी घटनास्थळी उपस्थित लोकांनी माहिती दिली आहे. या सर्व घटनेमध्ये एका लोकल जर्नलिस्टचाही मृत्यू झाला होता.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी बीजेपी नेते अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर आरोप केले होते. इतके पुरावे असूनही संभाव्य आरोपी म्हणून त्यांना अटक करण्याच्या ऐवजी, पोलीसांनी त्यांना स्टेशनमध्ये हजर राहण्याचे समन्स दिले होते. याउलट विरोधी पक्षनेत्या प्रियांका गांधी जेव्हा पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते.
Lakhimpur Kheri violence case, a seven-member Congress delegation will meet the President tomorrow
महत्त्वाच्या बातम्या
- मोठ्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा, दिल्ली-एनसीआर, यूपी, जम्मू आणि काश्मीरमधील 18 ठिकाणी NIAचे एकाच वेळी छापे
- PRASHANT DAMLE EXCLUSIVE PART 1: अभिनय सम्राट प्रशांत दामलेंच्या सुरांनी सजला ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान पुरस्कार
- उत्तर प्रदेश दिग्विजयासाठी भाजपचा मास्टर प्लॅन, 100 दिवसांत 100 कार्यक्रम
- काश्मीरमधील हिंदूंच्या हत्येचा वर्ध्यात निषेध; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुतळा जाळला