विशेष प्रतिनिधी
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीतील गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याच्या बंदुकीतूनच लखीमपूर खेरीमध्ये गोळीबार करण्यात आला होता, असे फॉरेन्सिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. आशिष यानेच शेतकऱ्यांच्या जथ्यात वाहन घुसविले. Lakhimpur incident: Forensic report reveals that the shooting was caused by the gun of the Union Minister’s son
त्यामध्ये चार शेतकरी मरण पावले असे पोलिसांच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहेत. घटनास्थळी आढळलेल्या रिकाम्या काडतुसांसोबत या बंदुकांची जुळवणी करण्यात येणार आहे.आशिष मिश्रा आणि त्याचा मित्र अंकित दास यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुकांमधून गोळीबार झाल्याचे उघड झाले आहे.
उत्तर प्रदेश सरकार व तेथील पोलिसांच्या तपासाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत तीनदा नाराजी व्यक्त केली आहे.लखीमपूरच्या तिकुनिया येथे ३ आॅक्टोबर रोजी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जथ्यात वाहने घुसविण्यात आली. त्त्यानंतर बराच काळ केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा गायब होता.
त्याच्याकडून रायफल व रिवॉल्वर तर अंकितकडून रिपीटर गन व पिस्तूल अशा ४ बंदुका जप्त करण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडे बंदुकांचा परवानाही आहे. यापैकी तीन बंदुकांमधून गोळीबार झाल्याचे बॅलेस्टिक अहवालातून स्पष्ट झाले आहे.
आशिषची जीप संतप्त शेतकऱ्यांनी जाळली होती. त्यामध्ये दोन काडतुसे सापडली होती. गोळीबार करण्यात आला ती रायफलदेखील ३१५ बोअरची आहे. बंदुका आणि रिकामे काडतूस न जुळल्यास गोळीबार कधी आणि कुठे झाला, याची माहिती मिळणे कठीण आहे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
Lakhimpur incident: Forensic report reveals that the shooting was caused by the gun of the Union Minister’s son
महत्त्वाच्या बातम्या
- PADMA AWARDS 2021 : बीजमाता राहीबाईंचा दिल्लीत गौरव ! नथीचा नखरा…नव्हे…नव्हे ‘गावरान’ ठसका! कोण आहेत राहीबाई पोपेरे ?
- तेलंगणाचे मुख्यमंत्री बिथरले, भाजप नेत्यांना जीभ कापून टाकण्याची दिली धमकी
- मोदी ज्याप्रकारे देश चालवित आहेत तशी तुम्हाला मुंबई महापालिकाही चालविता येत नाही, नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
- लिओनार्डो डिकॅप्रियोला पाहताच जेफ बेझोसची गर्लफ्रेंड लॉरेन सांचेझच्या फॅन गर्ल मोमेंटचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल