प्रतिनिधी
नवी दिल्ली : शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची नवी दिल्ली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. खासदारांच्या बैठकीच्या दिवशी ते दिल्ली येथे गेले होते. दोनवेळा त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर काल शिंदे गटाच्या कार्यालयाकडून अर्जून खोतकरांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे पत्र जारी केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र, खोतकरांनी आपण शिवसेनेतच असल्याचे सांगितले आहे. आपण वैयक्तिक कारणांनी दिल्लीला गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खोतकर नेमके कुणासोबत, असा प्रश्न निर्माण झाला आहे.Khotkar Talks that Arjun Khotkar is also on the path of Shinde group, Khotkar says – I am still in Shiv Sena!
याआधीही शिंदेंना भेटले?
अर्जुन खोतकर हे काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. खासदारांची बैठक ज्या दिवशी झाली त्याच दिवशी शिंदे यांची खोतकर यांनी महाराष्ट्र सदन येथे भेट घेतली होती अशी मतदारसंघात चर्चा होती. त्यानंतर आता ते शिंदे गटात सामिल होत असल्याचे पुढे आले आहे. तर त्यांनी आपण अजूनही शिवसेनेतच आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
अर्जुन खोतकर हे शिवसेनेचे निष्ठावंत मानले जातात. त्यांच्या नैतृत्वातच जालना जिल्ह्यात शिवसेना आणखी प्रबळ झाली. जालन्याचा गड ते सातत्याने राखत आले आहेत. मागील निवडणूकीत मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यांच्या शिंदेसेनेतील प्रवेशामुळे अनेक शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठवाड्यात शिवसेनेला धक्के
मराठवाडा हा शिवसेनेचा अभेद्य गड मानला जातो, पण याच गडाला आता घरघर लागली. औरंगाबादेतील बहुतांश आमदार शिंदे गटात गेले आणि शिवसेनेला दगाफटका सहन करावा लागला. मराठवाड्यात दोनच दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांनी डॅमेज कंट्रोलसाठी सभा घेत शक्तीप्रदर्शन केले पण त्यानंतर लगेचच खोतकर यांचे शिंदे गटाशी गुफ्तगू करीत आहेत. पर्यायाने मराठवाड्यात शिवसेनेचे नुकसान थांबता थांबत नसल्याचे दिसून आले आहे.
खोतकर म्हणाले- मी तर बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक…
अर्जुन खोतकर यांनी खुलासा करत म्हटले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यात काहीच गैर नाही. दिल्लीत त्यांची आणि माझी भेट झाली. या भेटीवेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, खासदार कपिल पाटील यांच्यासह अन्य काही लोक उपस्थित होते. मी बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा शिवसैनिक आहे आणि अजूनही शिवसेनेतच आहे.
Khotkar Talks that Arjun Khotkar is also on the path of Shinde group, Khotkar says – I am still in Shiv Sena!
महत्वाच्या बातम्या
- Droupadi Murmu Profile : कोण आहेत द्रौपदी मुर्मू? पतीच्या निधनानंतर 2 मुलेही गमावली, शिक्षिका झाल्या; नंतर पाटबंधारे विभागात लिपिक म्हणून काम
- केंद्र सरकारच्या रडारवर आदित्य ठाकरे; 2.5 वर्षांतल्या कामकाजाचे होणार ऑडिट!!
- ईडीच्या जाळ्यात अडकलेल्या मंत्र्याला ममतांचा “डच्चू”; पार्थ चटर्जींनी ममतांना 4 फोन केले, एकही उचलला नाही!!
- शिवरायांबद्दल अपूर्व आत्मीयता, अभिमान ही शिवशाहीर पुरंदरेंची प्रेरणा… तब्बल ४८ वर्षांपूर्वी पवारांनी असे काढले होते गौरवोद्गार