विशेष प्रतिनिधी
मोगा – पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आल्यानंतर प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपये जमा केले जातील, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.Kejariwal assures money to women in Punjab
केजरीवालांनी याआधीच प्रत्येक घराला चोवीस तास तीनशे युनिट मोफत वीज आणि सरकारी रुग्णालयात मोफत उपचारांबरोबरच मोफत औषधे देण्याचीही घोषणा केली आहे.येथील प्रचारसभेत केजरीवाल म्हणाले की, “ पंजाबमध्ये आगामी सरकार हे आम आदमी पक्षाचे असेल.
सत्ता येताच आम्ही अठरा वर्षांवरील प्रत्येक महिलेच्या बॅंक खात्यामध्ये दरमहा एक हजार रुपयांची रक्कम जमा करू.” ज्या वृद्ध महिलांना आता एक हजार रुपयांचे निवृत्तिवेतन दिले जाते ते भविष्यात देखील सुरू राहील आणखी एक हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा विचार आहे, असे त्यांनी नमूद केले.
Kejariwal assures money to women in Punjab
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांसाठी केले तेवढे काम कोणत्याही शेतकरी नेत्यानेही केले नाही, जे. पी. नड्डा यांनी सुनावले
- राज्यकर्त्यांनी आपल्या निर्णयांचा दररोज आत्मपरीक्षण करावे, सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांची अपेक्षा
- बलात्काराचा आरोप करत हनी ट्रॅप प्रकरणात बड्या उद्योगपतीची कोट्यवधीची फसवणूक, अभिनेत्याची पत्नी अटकेत
- आता खऱ्या गरजुंनाच मिळणार पंतप्रधान आवास योजनेचा लाभ, नियमांमध्ये केला बदल