विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीत लॉकडाउन वाढवत नेणे भाग पडल्याने उपासमारीची वेळ आलेल्या लाखो गोरगरिबांसाठी अरविंद केजरीवाल सरकारने मोफत रेशन देण्याची योजना जाहीर केली.Kejarival govt. declares free ration scheme
त्यानुसार दिल्लीतील शिधापत्रिकाधारकांना पुढचे २ महिने मोफत रेशन देण्याची घोषणा करण्यात आली. त्याचप्रमाणे रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांनाही दरमहा ५-५ हजार रुपयांचे रोख अर्थसाहाय्य करण्याचे केजरीवाल यांनी जाहीर केले.
लॉकडाउन वाढवावा लागल्याने रोजीरोटीसाठी रोजची लढाई करावे लागणारे गरीब लोक, मजुरी करणारे, रोजंदारीच्या कामावर जाणारे तसेच पदपथांवरील फिरते विक्रेते आदींची उपासमार होत आहे.
त्यामुळे राज्य सरकारने पुढच्या दोन महिन्यांसाठी मोफत अन्नधान्य देण्याची योजना जाहीर केली आहे.दिल्लीत किमान ७२ लाख शिधापत्रिकाधारक व सुमारे पावणेदोन लाख नोंदणीकृत रिक्षा/ टॅक्सीचालक आहेत.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सर्वप्रथम १९ एप्रिलला जो सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर केला, त्यानंतर संसर्गाची परिस्थिती भीषण होत गेली. परिणामी लॉकडाउन तीनदा वाढवावा लागला आणि या आठवड्यानंतर १० मे नंतरही तो उठविण्यासारखी परिस्थिती नाही.
दिल्लीत दररोज २० हजाराहून जास्त रुग्ण येत आहेत आणि मृतांचा आकडा आता दररोज ४०० आणि त्याच्या पुढे गेला आहे. दिल्लीतील सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालये भरून गेली आहेत.
Kejarival govt. declares free ration scheme
महत्त्वाच्या बातम्या
- मराठा आरक्षणाच्या रद्दच्या संपूर्ण घोळाची जबाबदारी ठाकरे – पवार सरकारची; केंद्रावर खापर फोडण्याचा प्रयत्न ऍटर्नी जनरलने हाणून पाडला होता
- Maratha Reservation : मराठा समाजाने कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये ; खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे आवाहन
- मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य सरकारकडून कुणीही कारभारी नव्हता, याचिकाकर्त्या विनोद पाटील यांचा आरोप
- मराठा समाज शैक्षणिक, सामाजिक मागास नाही; त्यांना आरक्षित कॅटॅगेरीत आणता येत नाही; सुप्रिम कोर्टाचे परखड मत
- Maratha Aarakahan Result 2021 : मराठा सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत अशी दुरुस्ती संपुष्टात; सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण ; वाचा सविस्तर