• Download App
    "दाढी लहान करा, लवकर लग्न करा, आम्ही तुमच्या मिरवणुकीत..." लालूंचा राहुल गांधींना सल्ला! Keep your beard short get married early Lalu Prasad Yadavs advice to Rahul Gandhi

    “दाढी लहान करा, लवकर लग्न करा, आम्ही तुमच्या मिरवणुकीत…” लालूंचा राहुल गांधींना सल्ला!

    जाणून घ्या,  सोनिया गांधींचा उल्लेख करत लालूंनी काय सांगितलं आहे?

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : आगामी लोकसभा निवडणूक 2014 संदर्भात शुक्रवारी बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांची सर्वसाधारण बैठक झाली. यात 16 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. ज्यामध्ये नितीश कुमार, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, लालू प्रसाद यादव, शरद पवार, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल आणि सीताराम येचुरी यांसारखे दिग्गज सामील होते. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ब्रीफिंग देताना लालू प्रसाद यादवही आपल्या जुन्या शैलीत दिसले. त्यांनी नितीश कुमार यांच्यासह पंतप्रधान मोदींनाही टोला लगावला. तसेच राहुल गांधींना दाढी लहान ठेवण्याचा सल्ला दिला. Keep your beard short get married early Lalu Prasad Yadavs advice to Rahul Gandhi

    लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांनी राहुल गांधींना लूक बदलण्याचा विनोदी सल्ला दिला. नितीश यांच्या एका शब्दाच्या श्लेषाचा समाचार घेतल्यानंतर लालू प्रसाद यादव म्हणाले, “तुम्ही पदयात्रा सुरू केली, तर दाढी ठेवली. असे करू नका, जरा काळजी घ्या की फार वाढणार नाही.” लालू यादव म्हणाले, ” पंतप्रधान मोदींना पाहिले का?… त्यांची दाढी लहान आहे. तुमची दाढी त्यापेक्षा जास्त नाही वाढली पाहिजे.”

    यासोबतच लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधींना लग्न करण्याचा सल्लाही दिला आहे. लालू म्हणाले, “तुम्ही आमचा सल्ला ऐकला नाही. अजून लग्न केले नाही. अजूनही जास्त वेळ गेलेला नाही. तुम्ही लग्न करा आणि आम्ही सगळे तुमच्या लग्नाच्या मिरवणुकीत सहभागी होऊ. तुम्ही लग्न करा, आमचे ऐका.” लालू यादव यांचे म्हणणे ऐकून विरोधी पक्षांचे सर्व नेते हसत असतानाच राहुल गांधींनाही हसू आवरता आले नाही. सोनिया गांधींचा उल्लेख करत लालू म्हणाले, “तुमची आई म्हणायची, त्याला लग्न करायचे नाही का, माझे ऐकत नाही, त्याचे लवकर लग्न करा.”

    राघव चढ्ढा, संजय सिंह, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे (एसपी) प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. याशिवाय सुप्रिया सुळे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री नेते एमके स्टॅलिन, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, डी राजा, दीपंकर भट्टाचार्य, मेहबूबा मुफ्ती, ओमर अब्दुल्ला यांनीही हजेरी लावली.

    Keep your beard short get married early Lalu Prasad Yadavs advice to Rahul Gandhi

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक