• Download App
    आता काश्मीर जोडले जाणार नैसर्गिक वायू वाहिनीने|Kashmir will now be connected by a natural gas pipeline

    आता काश्मीर जोडले जाणार नैसर्गिक वायू वाहिनीने

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रस्ते, रेल्वेसोबत आता नैसर्गिक वायू पुरवठा विस्ताराची योजना केंद्र सरकारने आखली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या गेल (इंडिया) लिमिटेडने काश्मीरपर्यंत नैसर्गिक वायू वहनाची योजना जाहीर केली आहे.Kashmir will now be connected by a natural gas pipeline

    नैसर्गिक वायूंच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमाचा भाग म्हणून मे 2023 पर्यंत मुंबई ते नागपूर 700 किलोमीटर पाईपलाईन विस्ताराचे उद्दिष्ट असल्याचे गेलनं म्हटलं आहे. त्यामुळे संपूर्ण भारतभरात गॅसचा पुरवठा केला जाणार आहे.



    गेलचे अध्यक्ष आणि प्रमुख व्यवस्थापक मनोज जैन यांनी म्हटले आहे की, भारताची उर्जा आवश्यकता दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे पयार्यी इंधन साधनांच्या उपलब्धतेकडं सरकारचा कल आहे. नैसर्गिक वायूच्या वापराला केंद्रानं अग्रक्रम दिला आहे.

    वर्ष 2030 पर्यंत नैसर्गिक वायूचा वापर 6.7 टक्क्यांनी वाढून 15 टक्के करण्याचे उद्दिष्ट आहे. मनोज जैन यांनी पीटीआय-भाषाला दिलेल्या मुलाखतीत योजनेचे स्वरुप स्पष्ट केलं आहे. 425 किलोमीटर लांबीची गुरुदासपूर (पंजाब राज्य) ते श्रीनगर (जम्मू) पर्यंत पाईपलाईन विस्तारासाठी (पीएनजीआरबी) कडून मंजूरी मिळविण्याच्या प्रक्रियेत आहे.

    भारतातील दुर्गम भागात जाळ विस्तारण्यासाठी केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. आगामी 3-4 वर्षात योजना पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. नैसर्गिक वायूला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यांकडे कर कपातीची मागणी केली आहे. सध्या मुंबई ते झारसुगुडा (ओडिशा) मार्ग नागपुर आणि छत्तीसगडच्या रायपुर पर्यंत 1,405 किलोमीटर पाईपलाईन टाकत आहे. नागपूर पर्यंतचे काम मे 2023 सुरू होईल आणि उर्वरित काम दोन वर्षांच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

    Kashmir will now be connected by a natural gas pipeline

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले