• Download App
    कपिल सिब्बल बनले नवे "यशवंत सिन्हा"; गांधी परिवार वगळून विरोधी पक्ष नेत्यांना वाढदिवसाची मेजवानी; काँग्रेस नेतृत्वावर उमटवले प्रश्नचिन्ह। Kapil Sibal becomes new "Yashwant Sinha"; Birthday party for opposition leaders except Gandhi family; Question marks raised over the Congress leadership

    कपिल सिब्बल बनले नवे “यशवंत सिन्हा”; गांधी परिवार वगळून विरोधी पक्ष नेत्यांना वाढदिवसाची मेजवानी; काँग्रेस नेतृत्वावर उमटवले प्रश्नचिन्ह

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जी – 23 मधले बडे नेते कपिल सिब्बल आता नवे “यशवंत सिन्हा” बनले आहेत. यशवंत सिन्हा यांनी जसा राष्ट्र मंच बनवला तसा कोणताही मंच कपिल सिब्बल यांनी अद्याप बनवलेला नाही. परंतु त्यांनी जी 23 नेत्यांच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकले आहे. त्यांनी काल आपल्या वाढदिवसानिमित्त सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना मेजवानी दिली. यात फक्त गांधी परिवाराला वगळले होते. राहुल गांधी काल जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले प्रियंका गांधी सध्या परदेशात आहेत. Kapil Sibal becomes new “Yashwant Sinha”; Birthday party for opposition leaders except Gandhi family; Question marks raised over the Congress leadership

    कपिल सिब्बल यांच्या खास मेजवानीला काँग्रेसमधून पी. चिदंबरम, शशि थरूर, आनंद शर्मा आदी नेते हजर होते. त्याचबरोबर शरद पवार, समाजवादी पक्षाचे नेते उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, तृणमूळ काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, दिवंगत अजित सिंग यांचे पुत्र जयंत सिंग आदी उपस्थित होते.



    या खेरीज अकाली दलाचे नेते नरेश गुजराल पहिल्यांदाच काँग्रेस नेत्याने बोलावलेल्या मेजवानीला हजर राहिले होते. त्यांनी काँग्रेस नेतृत्व संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गांधी परिवार वगळल्या खेरीज काँग्रेसमध्ये स्वतंत्र नेतृत्व उभे राहू शकत नाही, असे मत त्यांनी उघडपणे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर काही वेळ नेत्यांनी खल केला. वर नमूद केलेल्या पक्ष नेत्यांखेरीच वायएसआर काँग्रेस, तेलगू देशम पक्ष या आंध्र आणि तेलंगणामधील परस्पर विरोधी पक्षांचे नेते देखील सिब्बल यांच्या मेजवानीत सामील झाले होते.

    गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उमटताच नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्यावर वेगळी टिपणी केली. काँग्रेस मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेस मजबूत झाली म्हणजे इतर विरोधी पक्षांना देखील आपल्या राज्यात बळ मिळेल, असे ते म्हणाले.

    तीन नेते, तीन प्रयत्न

    प्रामुख्याने या मेजवानीत चर्चेचा भर विरोधी पक्षांची एकजूट हाच राहिला. याचा अर्थ विरोधकांच्या एकजुटीसाठी तीन वेगवेगळे नेते प्रयत्न करत आहेत, असाही घेतला जात आहे. ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत एकजुटीसाठी पाच दिवसांचा दौरा केला. त्यानंतर राहुल गांधी यांनी विरोधी ऐक्य संसद अधिवेशनाच्या निमित्ताने साधून घेतले. आणि कपिल सिब्बल यांनी आता मेजवानी देऊन सर्व विरोधी नेत्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे. या तीनही नेत्यांचे प्रयत्न एकाच दिशेने असले तरी वेगवेगळे आहेत. राष्ट्र मंचाच्या 6 जनपथमध्ये झालेल्या बैठकीसारखे ते अद्याप फसलेले नाहीत. उलट शरद पवार हेच कपिल सिब्बल यांच्या मेजवानीत सामील होऊन यांनी आपली तात्पुरती राजकीय दिशा स्पष्ट केली आहे.

    Kapil Sibal becomes new “Yashwant Sinha”; Birthday party for opposition leaders except Gandhi family; Question marks raised over the Congress leadership

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!