• Download App
    जम्मू-काश्मीरमधील मुगल गार्डन्सच्या पुनर्स्थापनेचे काम संगीता जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडे |J&K govt signs MoU with Mumbai-based JSW Foundation for restoration & conservation of two Mughal gardens in Kashmir.

    जम्मू-काश्मीरमधील मुगल गार्डन्सच्या पुनर्स्थापनेचे काम संगीता जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडे

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीर मधून 370 कलम हटविल्यानंतर जी अनेक विकास कामे सुरू आहेत त्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे जम्मू-काश्मीरची शान असलेल्या मुघल गार्डन्सच्या पुनर्स्थापनेचे काम. ही दोन्ही मुघल गार्डन्स सध्या दुरवस्थेत आहेत त्यांच्या पुनर्स्थापनेचे काम उद्योगपती जिंदाल समूहाच्या संगीता जिंदाल यांच्या जेएसडब्ल्यू फाउंडेशनकडे देण्यात आले आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन आणि जेएसडब्ल्यू फाउंडेशन यांच्यात त्या संदर्भात सामंजस्य करार झाला आहे.J&K govt signs MoU with Mumbai-based JSW Foundation for restoration & conservation of two Mughal gardens in Kashmir.

    यामध्ये मुघल गार्डन्समधील हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन त्याचबरोबर गार्डनची जुनी वैभवशाली रचना पुनर्स्थापित करणे ही कामे आहेत. जेएसडब्ल्यू फाउंडेशन याला युनेस्कोचे अवॉर्ड प्राप्त झाले आहे. महिला सक्षमीकरण यांपासून लहान मुलांचे भरण-पोषण तसेच हेरिटेज वास्तूंच्या पुनर्निर्माणाचे काम जेएसडब्ल्यू फाउंडेशन करते. त्यांचे काम पाहून जम्मू-काश्मीर सरकारने त्यांना श्रीनगरमधील मुगल गार्डनच्या पुनर्स्थापनेचे काम सोपविले आहे.



     

    येत्या अडीच ते तीन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होऊन काश्मिरची शान असलेली मुघल गार्डन्स पुन्हा थाटात उभी राहतील. तेथे पुन्हा एकदा बहारदार सिनेमांचे शुटिंग सुरू होईल, अशी अपेक्षा केंद्रशासित प्रदेश प्रदेशाचे प्रशासन आणि मुगल गार्डनचे संचालक जे. एस. मसुदी यांनी व्यक्त केली आहे.

    हिमालयातील दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन तसेच जुन्या मोगल शैलीतील हेरिटेज वास्तू हे मुगल गार्डन्सचे वैशिष्ट्य आहे. तेथे काश्मीर की कली तसेच अनेक जुन्या सिनेमांचे आणि गाण्यांचे शूटिंग झालेले आहे. हे वैभव दोन्ही मुगल गार्डन्सला पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये मोठे यश मिळाल्यास जम्मू -काश्मीर साठी पर्यटन आणि सिनेमांचे शूटिंग यातून विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसा उपलब्ध होईल.

    J&K govt signs MoU with Mumbai-based JSW Foundation for restoration & conservation of two Mughal gardens in Kashmir.

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!