• Download App
    जम्मू-काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होईल ; मेजर सुरेंद्र पूनिया यांचे ट्विट Jammu and Kashmir soon became a state ; Major Surendra Poonia's tweet

    जम्मू-काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा प्राप्त होईल ; मेजर सुरेंद्र पूनिया यांचे ट्विट

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : जम्मू – काश्मीरला लवकरच संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात येईल. सर्व विशेष अधिकार मागे घेण्यात येतील. तसेच देशातील इतर सर्व राज्याप्रमाणे जम्मू-कश्मीर समान असेल, असे ट्विट भाजपचे नेते मेजर सुरेंद्र पूनिया यांनी केले आहे. Jammu and Kashmir soon became a state ; Major Surendra Poonia’s tweet

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू – काश्मीरमधील सर्व पक्षांतील नेत्यांची २४ जून रोजी एक बैठक बोलावली आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले आहे.
    दरम्यान, ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केले आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्याचे विभाजन झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी जम्मू-काश्मीरमधील राजकीय गतिरोध संपविण्याच्या दिशेने केंद्राचे हे पहिल पाऊल मानले जात आहे. या बैठकीत जम्मू-काश्मीरच्या दोन्ही भागातील नेत्यांना बोलावले आहे. शुक्रवारपर्यंत जम्मू-काश्मीरमधील ९राजकीय पक्षांना या बैठकीसाठी आमंत्रित केले.



    परंतु पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकीत १६ पक्षांना बोलावले जाण्याची शक्यता आहे. तथापि, अद्याप औपचारिक आमंत्रण दिलेले नाही. या बैठकीत जम्मू-काश्मीर आणि विधानसभा निवडणूक तसेच संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

    एका वृत्तसंस्थेनुसार केंद्राने नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला, पीडीपी अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती, जम्मू-काश्मीर आपनी पक्षाचे अल्ताफ बुखारी आणि पीपल्स कॉन्फरन्सचे प्रमुख सज्जाद लोणे यांना या बैठकीला आमंत्रित केले आहे. जम्मू-काश्मीरमधील भाजप आणि कॉंग्रेसचे नेतेही सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    Jammu and Kashmir soon became a state ; Major Surendra Poonia’s tweet

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल