मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.Jammu and Kashmir: Security forces achieve great success, eliminate three Jaish-e-Mohammed terrorists
विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरच्या बडगाममधील जोलवा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली.दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलाने ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.तसेच अजूनही चकमक सुरु असून आणखी काही दहशतवादी लपून बसले असल्यानं त्यांचा शोध घेतला जात आहे.
काश्मीरच्या आयजीपींनी दिलेल्या माहितीनुसार, बडगाममध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. ते जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचे आहेत त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. मृत दहशतवाद्यांकडून शस्त्रे, दारुगोळा आणि इतर गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यात जोलवा गावात शोधमोहिम सुरु केली होती.दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. अखेर चकमकीमध्ये तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. एकजण श्रीनगरमधील असून वसिम असं त्याचं नाव आहे.
Jammu and Kashmir: Security forces achieve great success, eliminate three Jaish-e-Mohammed terrorists
महत्त्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी : लिबरल बुद्धिमंतांचा “सिलेक्टिव्ह पर्सनॅलिटी कल्ट” व्यक्तिपूजा वगैरे…!!
- Peter Bogdanovich : हॉलिवूडचे महान दिग्दर्शक-प्रसिद्ध लेखक-चित्रपट पत्रकार-पीटर बोगदानोविच यांचे ८२ व्या वर्षी निधन
- JAWED HABIB : थुंक में जान है, म्हणत महिलेवर थुंकून हेअरकट ! महिलेचा संताप-गल्लीबोळातल्या न्हाव्याकडून केस कापा पण हबीबकड़ून नको