• Download App
    ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करा - शशी थरूर। Investigate the Pegasus case under the supervision of a Supreme Court judge - Shashi Tharoor

    ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करा – शशी थरूर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पेगॅसस कथित पाळतप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी केली आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात थरूर यांच्या नेतृत्वाखालील संसदीय समिती ही माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयातील अधिकाऱ्यांची चौकशी करणार आहे. Investigate the Pegasus case under the supervision of a Supreme Court judge – Shashi Tharoor

    मागील आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय माध्यमांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्ये तीनशेपेक्षाही अधिक दूरध्वनी क्रमांक या स्पायवेअरच्या रडारवर होते असा दावा करण्यात आला होता.



    यामध्ये दोन मंत्री, चाळीसपेक्षाही अधिक पत्रकार आणि तीन विरोधी नेत्यांचा देखील समावेश होता. आता यामध्ये लष्करी अधिकाऱ्यांची देखील भर पडली आहे. विरोधकांनी याच मुद्यावरून सरकारला संसदेमध्ये धारेवर धरले आहे. सरकारने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

    थरूर म्हणाले, या विषयावर केंद्र सरकार चर्चा घेत नाही तोपर्यंत विरोधकांची आक्रमक भूमिका कायम राहील. या प्रकरणामध्ये स्वार्थी राजकीय हेतूसाठी केंद्र सरकारने लोकांच्या पैशांचा वापर केल्याचे दिसून येते.

    Investigate the Pegasus case under the supervision of a Supreme Court judge – Shashi Tharoor

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistani Army Chief : पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणाले- देशाला दिलेले वचन पूर्ण केले; भारतीय सैनिक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

    PM Modi : पीएम मोदी म्हणाले- पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास चोख प्रत्युत्तर देऊ; कारवाई फक्त स्थगित, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही

    Amit Shah : पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताच्या शत्रूंसाठी मर्यादा निश्चित केली – अमित शाह