भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या महू येथे पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे. इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या मोबाईलवरून बोलत असताना त्यांची फ्रिक्वय्न्सी गुप्तचर विभागाने पकडली.Intelligence operatives caught talking to Pakistanis on mobile phones, spying teacher sisters arrested
विशेष प्रतिनिधी
इंदूर : भारतीय लष्कराचे केंद्र असलेल्या महू येथे पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाºया दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली आहे.
इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. या दोघी शिक्षिका म्हणून काम करत होत्या. त्या मोबाईलवरून बोलत असताना त्यांची फ्रिक्वय्न्सी गुप्तचर विभागाने पकडली.
या दोघी बहिणी महू येथील एका शाळेत शिकवायचं काम करत होत्या. यातील एकीचं वय ३२ तर एकीचं वय २८ वर्षे आहे. पाकिस्तानातील मोहसीन खान आणि दिलावर यांच्या संपर्कात असल्याचे उघड झालं आहे.
अटक केल्यानंतर गुप्तचर विभाग आणि स्थानिक पोलीस कसून तपास करत आहे. इंदौरच्या गवळी पलासिया भागात त्या राहतात.गेल्या काही दिवसांपासून त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या.
काही दिवसांपूर्वी दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. या दरम्यान गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि त्यांचं बिंग फुटलं.
त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांच्यावर सतत चार दिवस पाळत ठेवली होती. अखेर त्यांच्या संशयास्पद हालचाली वाढल्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं. चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांच्याकडील लॅपटॉप आणि मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या दोघी पाकिस्तानी गुप्तहेरांशी गेल्या वर्षभरापासून संपर्कात होत्या. यासाठी त्यांनी सोशल मीडियावर खोटी ओळख असलेली खातीही तयार केली होती.
संशय येऊ नये म्हणून दोघींनी चार महिन्यात चार सिमकार्ड विकत घेतली होती. तसेच त्यांना मॉरिशसमधून फंडिंग होत असल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
Intelligence operatives caught talking to Pakistanis on mobile phones, spying teacher sisters arrested
महत्वाच्या बातम्या
- टाटा स्टिल कंपनीचा निर्णय : कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास वयाच्या साठ वर्षांपर्यंत कुटुंबाला पूर्ण वेतन, घर आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च
- काँग्रेसला फोडून राष्ट्रवादीचे मिशन केरळ, माजी महिला काँग्रेस अध्यक्षाही काँग्रेस सोडणार
- पंजाबधील कॉँग्रेस सरकार अडचणीत, सिध्दूंसाठी अंतरात्म्याचा आवाज ऐकून राजीनामे देण्याचे आमदारांना आवाहन
- राज्यपालनियुक्त १२ आमदारांची यादी महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांकडे पाठविलीच नाही, माहिती अधिकार कायद्यात उघड