• Download App
    जनतेला महागाईचे चटके; १४.५५ टक्के वाढली; तेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा भडका । Inflation hits the masses; 14.55 per cent increase; The rise in prices of essential commodities, including oil

    जनतेला महागाईचे चटके; १४.५५ टक्के वाढली; तेलासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीचा भडका

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशात महगाई वाढल्याने जनतेला तिचे चटके बसू लागले आहे. महागाईचा दर ,१४.५५ टक्के झाला आहे.  देशात महागाईने घेतलेला सुसाट वेग थांबायला तयार नाही. मार्चमध्ये ठोक महागाई दर १४.५५% नोंदला आहे. हा गेल्या चार महिन्यांत सर्वात जास्त आहे. याचे मुख्य कारण तेल, विविध जिनसांच्या घाऊक किमतीतील तेजी आहे. Inflation hits the masses; 14.55 per cent increase; The rise in prices of essential commodities, including oil

    सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, घाऊक महागाई दर १० टक्क्यांवर राहिलेला मार्च सलग १२ वा महिना राहिला आहे. याआधी नोव्हेंबर २०२१ मध्ये ही १४.८७% च्या उच्च पातळीवर हाेती. या वर्षी फेब्रुवारीमध्ये हा १३.११% होता.



    गेल्या वर्षी मार्चमध्ये ७.८९% होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानुसार, घाऊक महागाई दरातील वाढ प्रामुख्याने कच्चे तेल, नैसर्गिक वायू, खनिज तेल, धातू आदींच्या किमतीतील वाढीमुळे झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने महागाई वाढली. बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणाले, घाऊक महागाई वाढण्याचा परिणाम हळूहळू किरकोळ किमतींवरही होतो. मात्र, रिझर्व्ह बँक पतधोरणाशी संबंधित निर्णय घेताना किरकोळ महागाई दराच्या आकड्यांकडे लक्ष दिले जाते.

    Inflation hits the masses; 14.55 per cent increase; The rise in prices of essential commodities, including oil

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    पाकिस्तानी लष्करप्रमुखाच्या हिंदू हेट स्पीच नंतरच पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला; सर्जिकल आणि एअर स्ट्राइक पेक्षाही जबरदस्त तडाख्याची मोदी सरकारकडून अपेक्षा!!

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला, अनेक पर्यटक जखमी

    DGP murder case : निवृत्त डीजीपी हत्या प्रकरणात मोठा खुलासा ; पत्नी ५ दिवसांपासून गुगलवर हत्येचा प्लॅन शोधत होती