• Download App
    त्रिपुरातील बांग्ला देशींची घुसखोरी कायमची थांबणार, भारत- बांग्ला देश सीमेवर कुंपण उभारले जाणार|Infiltration of Bangladeshis in Tripura will be stopped forever, fence will be erected on India-Bangladesh border

    त्रिपुरातील बांग्ला देशींची घुसखोरी कायमची थांबणार, भारत- बांग्ला देश सीमेवर कुंपण उभारले जाणार

    विशेष प्रतिनिधी

    आगरताळा : त्रिपुराची बांग्लादेशी घुसखोरी आता कायमची संपणार आहें. भारत- बांग्ला देश सीमेवर आता सर्वंकष कुंपण उभारले जाणार आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) महानिरिक्षकांनी ही माहिती दिली आहे.Infiltration of Bangladeshis in Tripura will be cforever, fence will be erected on India-Bangladesh border

    त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवर पुढील वर्षभरात सर्वंकष सुरक्षा देणारे कुंपण उभारले जाईल, अशी माहिती बीएसएफचे महानिरीक्षक सुशांतकुमार नाथ यांनी आज शनिवारी दिली. भारत-बांगलादेशातील 856 कि.मी. लांबीच्या ईशान्येतील सीमेवर कुंपण उभारण्याचे 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.



    त्रिपुरातील उर्वरित सीमेवरील कुंपणाचे काम वर्षभरात पूर्ण होईल. सुरुवातीला 31 कि. मी. लांबीच्या कुंपणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. याच वेगाने मागील वर्षी 10 कि. मी. लांबीचे कुंपण राज्याच्या पूर्वकडील सीमाभागात टाकण्यात आले. कुंपण उभारतानाच त्यावर फ्लडलाईट्स बसवले जाणार आहेत, अशी माहिती नाथ यांनी दिली.

    त्रिपुरातील भारत-बांगलादेश सीमेवरील कुंपणाचे आणि त्यावर फ्लडलाईट्स बसवण्याचे काम वर्षभरात पूर्ण होईल. 2017 पासून एनएलएफटीच्या 13 बंडखोरांनी बीएसएफसमोर शरणागती पत्करली, असे त्यांनी सांगितले.

    Infiltration of Bangladeshis in Tripura will be stopped forever, fence will be erected on India-Bangladesh border

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार