• Download App
    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन । India's Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    रशिया, युक्रेन वादात भारताची विश्वामित्र भूमिका; युद्ध संघर्ष टाळण्याचे दोन्ही देशांना आवाहन

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा भडका जगाला परवडणारा नाही. त्यामुळे दोन्ही देशांनी संघर्ष टाळून जगाला युद्धाच्या खाईत लोटु नये, अशी विश्वामित्र भूमिका भारताने घेतली आहे. India’s Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाची ठिणगी केव्हा पडेल याचा नेम नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनच्या दोन प्रांताना स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे संघर्ष आणखी चिघळण्याचा धोका आहे.



    या घडामोडीच्या पार्श्वभूमिवर भारताने तटस्थ भूमिका घेतल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
    या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताची भूमिका मांडताना टीएस त्रिमूर्ती म्हणाले, हा प्रश्न चर्चेने सोडविला पाहिजे. युद्ध जगाला परवडणारे नाही. दोन्ही देशांतील संघर्ष वाढणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. लष्करी कारवाईने परिसरातील तणाव आणि शांतता नष्ट होण्याचा धोका आहे. तसेच त्याचे परिणाम जगाला भोगावे लागतील.

    India’s Vishwamitra role in the Russia-Ukraine dispute; Appeal to both countries to avoid war

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Anil Ambani : हवाला प्रकरणात अनिल अंबानी दुसऱ्यांदा गैरहजर; ऑनलाइन स्टेटमेंट देण्याची विनंती; 100 कोटींशी संबंधित हवाला प्रकरण

    Army Chief : लष्करप्रमुख म्हणाले- ऑपरेशन सिंदूर हा 88 तासांचा ट्रेलर होता; पाकने आणखी संधी दिल्यास उत्तर कठोर असेल

    PM Modi, : पीएम मोदी म्हणाले- लालू यादव यांनी विकासाऐवजी जंगलराज निवडले, बिहारच्या निकालांनी धडा शिकवला