वृत्तसंस्था
बर्लिन : जागतिक तापमान वाढ हा कळीचा आणि जीवन मरणाचा प्रश्न बनला आहे. भविष्यातील धोका पाहता हा प्रश्न भारतीयांशिवाय सोडविताचा येणार नाही, असा दृढविश्वास जर्मनीने व्यक्त केला आहे. तसेच पृथ्वीला या संकटापासून वाचविण्याच्या कार्यासाठी भारताला दहा हजार २८ कोटींची मदत जाहीर केली आहे. India’s role in preventing global warming is crucial; 10,028crore assistance from Germany
पृथ्वीवरील लोकसंख्येचा विचार केला तर भारत त्यामध्ये दुसरा आहे. पर्यायाने पाचवा माणूस हा भारतीय आहे.त्यामुळे मोठे प्रश्न सोडविण्यासाठी भारतीयाच मोलाची मदत करु शकतात, असा विश्वास जर्मनीला वाटतो आहे. जागतिक तापमान रोखण्याच्या कार्यात जर भारताने पुढाकार घेतला तर एका मोठ्या संकटातून मनुष्य जात वाचू शकणार आहे, असे जर्मनीला वाटत आहे.
ऊर्जा ही भविष्यातली मोठी गरज बनणार आहे. पण, त्यासाठी पारंपरिक इंधन आणि ऊर्जा साधनांचा वापर करण्याऐवजी अपारंपरिक साधने वापरल्यास इंधन, ऊर्जेची गरज भागविता येईल तसेच त्याचे प्रतिकूल परिणाम पृथ्वीवर होणार नाहीत. पारंपरिक इंधनाचा वापर केल्याने कार्बन उत्सर्जन होण्याबरोबरच तापमान वाढीला चालना मिळते आहे. नेमकी हीच ओळखून त्या दिशेने पावले टाकण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर जर्मनीने भारताला ही मदत केल्याचे जर्मनीचे राजदूत वॉल्टर लिंडनेर यांनी सांगितले.
India’s role in preventing global warming is crucial; 10,028crore assistance from Germany
महत्त्वाच्या बातम्या
- वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे; हिंगोली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारतेय घनदाट जंगल
- दिलासा ! शहीद CRPF जवानांच्या कुटुंबियांना मोदी सरकारकडून मिळणार आत्ता ३५ लाखांची मदत
- काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल
- PMGKAY : प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला मार्च 2022 पर्यंत मिळाली मुदतवाढ; गरिबांना मोदी सरकारचा दिलासा
- CONGRESS VS TMC : दिल्लीत ममता दिदींची सोनियांना टाळत मोदी भेट- मेघालयमध्ये काँग्रेसला तृणमूलचा दे धक्का ! मुकुल संगमांसह १८ पैकी १२ आमदारांचा तृणमूल प्रवेश