• Download App
    अमेरिकेत १०० तासांत ६६ हजार भारतीयांनी उभारला ४७ लाख डॉलरचा निधी, भारतासाठी मदत करणार।Indians from USA collects money to help India

    अमेरिकेत १०० तासांत ६६ हजार भारतीयांनी उभारला ४७ लाख डॉलरचा निधी, भारतासाठी मदत करणार

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : कोरोना संकटाशी झगडत असलेल्या भारताला मदतीसाठी अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी उभा केला आहे. निधी उभारण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर १०० तासांच्या आत ६६ हजार ७०० हून अधिक भारतीय वंशाच्या नागरिकांनी ४७ लाख डॉलरचा निधी गोळा केला. Indians from USA collects money to help India

    ‘एकत्रित प्रयत्नांतून हजारो जणांचे जीव वाचविता येतील, अनेकांना मदत मिळेल आणि भारताला कोरोनाविरोधातील लढाईत बळ येईल,’ असे निधी उभारणाऱ्या ‘सेवा फौंडेशन’ने म्हटले आहे.



    या संस्थेने भारतात पाठविण्यासाठी २,१८४ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर सज्ज ठेवले आहेत. सेवा फौंडेशनही अमेरिकेतील भारतीयांची सर्वांत मोठी सेवाभावी संस्था आहे. हा निधी सोशल मीडियाच्या माध्यमातून जमा करण्यात आला आहे.

    याशिवाय अनेक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरही गोळा करण्यात आले आहेत. भारतात ऑक्सिजनचा वेगाने पुरवठा करणे, हे आमचे प्राथमिक उद्दीष्ट असल्याचे या संस्थेने सांगितले. या संस्थेचे स्वयंसेवक रुग्णवाहिक, रुग्णालयांतील खाटांची परिस्थिती याबाबत माहिती देणारा डिजीटल हेल्प डेस्कही तयार केला जात आहे.

    Indians from USA collects money to help India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    शिवसेना आणि तृणमूळ काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या बंडखोर २६ खासदारांना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची अधिमान्यता; बंडखोरीवर शिक्कामोर्तब!;

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाचे 12 रुग्ण, 4 मृत्यू; जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवले नमुने, शेजारील राज्य कर्नाटक सतर्कतेवर

    Plastic Currency Notes : देशात लवकरच प्लास्टिक नोटा चलनात येतील, आरबीआयIने निविदा जारी केली; ₹10 आणि ₹20 च्या नोटांपासून चाचणी सुरू होईल