विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे आता जगातील सर्वात उंच घाट पूल बांधत आहे. मणिपूरमधील जिरीबाम ते इम्फाळदरम्यान नोनी जिल्ह्यात जगातील सर्वात उंच घाट पूल बांधण्याचे काम केले जात असून, हा पूल जगातील सर्वात उंच पिअर ब्रिज असणार आहे. हा पूल 2023 मध्ये पूर्ण होणार आहे.Indian Railways will build the tallest railway bridge to reach the Myanmar border
हा पूल रेल्वे प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून बांधत आहे. 703 मीटर लांबीच्या या पुलाला मदत करणारे 9 पिलर बांधण्यात आले आहेत. ते तयार करण्यासाठी 11,780 मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. जिरीबाम-इम्फाळच्या 111 किलोमीटर लांबीच्या मार्गावर नोनी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या या पुलाची उंची 141 मीटर आहे.
हा पूल आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे. जिरीबाम ते इम्फाळ असा कारने प्रवास केल्यास किमान 10 तास लागतात, मात्र हा रेल्वे मार्ग सुरू झाल्याने अवघे 111 किलोमीटरचे अंतर सुमारे 2 ते अडीच तासांत पूर्ण होणार आहे.या रूळाच्या उभारणीमुळे म्यानमारची सीमा रेल्वे नेटवर्कच्या अगदी जवळ येईल,
ज्यामुळे आगामी काळात दोन्ही देशांमधील संबंध अधिक घट्ट होतील. रेल्वेच्या दृष्टिकोनातून कोणतेही लष्करी साहित्य आणायचे असेल किंवा घेऊन जायचे असेल तर ते या मागार्ने सहज वापर करता येईल. भारतीय रेल्वे ईशान्येकडील भागातून सीमा ओलांडण्याच्या तयारीत आहे. नेपाळ, म्यानमार, भूतान आणि बांगलादेश या देशांत रेल्वे रूळ टाकण्याचीही त्यांची योजना आहे.
Indian Railways will build the tallest railway bridge to reach the Myanmar border
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घटस्फोटित पत्नीचा देखभाल खर्च थकविला, उच्च न्यायालयाने त्वरित थकबाकी देण्याचे दिले आदेश
- म्यानमार सीमेपर्यंत जाण्यासाठी भारतीय रेल्वे बांधणार सर्वात उंच रेल्वे पूल
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय