• Download App
    गल्फच्या आखातात दररोज १६ व्यापारी जहाजांना भारतीय नौदलाचे खास संरक्षण। Indian nave gave security in gulf

    गल्फच्या आखातात दररोज १६ व्यापारी जहाजांना भारतीय नौदलाचे खास संरक्षण

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या ‘संकल्प’ मोहिमेअंतर्गत गल्फच्या आखातामध्ये दररोज सरासरी १६ भारतीय व्यापारी जहाजांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून दिला जात आहे. नौदलाने याबाबत निवेदन जारी केले आहे. Indian nave gave security in gulf

    इराण व अमेरिकेतील तणावादरम्यान ओमानच्या आखातात दोन तेलवाहू जहाजांवर तीन स्फोट झाल्यानंतर जून २०१९ मध्ये या मोहिमेला नौदलाने सुरुवात केली. तेंव्हापासून नौदलाचे हेलिकॉप्टर असलेले जहाज वायव्य अरबी समुद्र, ओमानचे आखात आणि पर्शियन आखातात सतत तैनात ठेवले आहे. त्याद्वारे, भारतीय सागरी समुदाय व व्यापारी जहाजांना मदत पुरविण्यात येते.



    नौदलाने २३ युद्धनौकाही ‘संकल्प’ मोहिमेसाठी तैनात ठेवल्या आहेत. या मोहितंर्गत दररोज सरासरी १६ भारतीय व्यापारी जहाजांना विनंतीनुसार समुद्रातून सुरक्षित मार्ग काढून दिला जातो. नौदलाचे सशस्त्र पथकही यावेळी व्यापारी जहाजांवर तैनात केले जाते. भारतात ८५ टक्के तेलाची आयात केली जाते. देशाने २०१९ – २०२० मध्ये ६६ अब्ज डॉलरचे तेल आयात केले. बहुतांश तेल याच मार्गाने देशात येते.

    Indian nave gave security in gulf

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- नेहरूंच्या चुका स्वीकारणे आवश्यक, पण प्रत्येक समस्येसाठी त्यांना एकट्याला दोषी ठरवणे चुकीचे

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले