• Download App
    गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय मच्छिमाराची हत्या | Indian fisherman killed by Pakistani navy off Gujarat coast

    गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी नौदलाकडून भारतीय मच्छिमाराची हत्या

    विशेष प्रतिनिधी

    गुजरात : गुजरातच्या किनारपट्टीवर पाकिस्तानी नौदलाने भारतीय मासेमारी नौकेवर गोळीबारा केला आहे. ह्या गोळीबारात एका मच्छिमाराचा मृत्यू झाला आहे. तसेच सागरी कमांडोंनी ही बोट ताब्यात घेऊन अन्य सहा मच्छिमारांचे अपहरण केले. पाकिस्तानी मरीन कमांडोजच्या बोटीने ‘जलपरी’ नावाच्या भारतीय बोटीवर गोळीबार केला.

    Indian fisherman killed by Pakistani navy off Gujarat coast

    गुजरातमधील द्वारका येथील ओखा शहराजवळ भारतीय मच्छिमार भारतीय जलक्षेत्रात मासेमारी करत असताना ही घटना घडली.


    पाकमध्ये दहशतवाद्यांपुढे इम्रान सरकारची सपशेल माघार, अवैध संघटनेच्या कार्यकर्त्यांना सोडणे भाग


    भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले, “गुजरात किनार्‍याजवळील अरबी समुद्रात पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सीने गोळीबार केला आहे. या घटनेची चौकशी सुरू आहे. ह्या गोळीबारात एक भारतीय मच्छिमार मरण पावला आणि एक जखमी झाला.’ याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून सध्या तपास सुरू आहे.

    Indian fisherman killed by Pakistani navy off Gujarat coast

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते