विशेष प्रतिनिधी
अँटिग्वा :अंडर १९ वर्ल्डकपच्या अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा ४ पराभव केला आणि विश्वविजेतेपदावर नाव कोरले. India won the World Cup Defeat of England in the final
भारत पाचव्यांदा विश्वविजेता ठरला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, तो त्यांच्या अंगउलट आला. ९१ धावात ५ गडी बॅड झाले. भारताच्या रवी कुमार आणि राज बावा यांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज टाकले नाहीत. संघ १८९ धावांत बाद झाला. इंग्लंडकडून जेम्स रियूने ९५ धावांची झुंज दिली. तर बावाने ५ बळी घेतले.
प्रत्युत्तरात भारताने सहा फलंदाज गमावले. पण उपकर्णधार शेख रशीद आणि निशांत सिंधूच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ केला. सर्व सामने जिंकले. राज बावाला सामनावीर तर दक्षिण आफ्रिकेच्या डेवाल्ड ब्रेविसला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.