वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : भारत आणि रशियाचे संबध मधुर आहेत. त्याबद्दल आमची कोणतीही ना नाही. परंतु रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन करणे क्रमप्राप्त आहे, असे मत अमेरिकेचे प्रवक्ते निड प्राईस यांनी व्यक्त केले आहे. India should put pressure on Russia to comply with international borders; US insistence
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. भारत आणि रशियात यांच्यात सामरिक, संरक्षण विषयक साहित्य खरेदीत सामंजस्य आहे. तसे आमचे रशियाशी नाही, अशी कबुली देताना ते म्हणाले, युक्रेन आणि रशियातील संघर्ष पाहता रशियाने आंतरराष्ट्रीय सीमांचे पालन केले पाहिजे. भारताबरोबर अन्य राष्ट्रांनी रशियावर तसा दबाव आणला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.