• Download App
    चीनच्या उद्दामपणाला भारताकडून चोख प्रत्युत्तर, गलवानमधील कमांडरला मशाल दिल्याने राजदूत टाकणार ऑलिम्पिकवर बहिष्कार|India responds sharply to China's arrogance: Ambassador to boycott Olympics

    चीनच्या उद्दामपणाला भारताकडून चोख प्रत्युत्तर, गलवानमधील कमांडरला मशाल दिल्याने राजदूत टाकणार ऑलिम्पिकवर बहिष्कार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : गलवान संघर्षात चीनला भारताकडून चांगलीच थप्पड खावी लागली. तरीही चीनचा उद्दामपणा संपला नाही. चीनने आगळिक करत गलवान संघर्षातील कमांडरला हिवाळी ऑलिम्पिमधील मशालीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिले असून राजदूत या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार आहे.India responds sharply to China’s arrogance: Ambassador to boycott Olympics

    चीनमध्ये उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिक 2022 च्या कोणत्याही अधिकृत समारंभाला भारताचे राजदूत उपस्थित राहणार नाहीत. परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले चीन ऑलिम्पिकच्या निमित्ताने राजकारण करत आहे याचे आम्हाला खेद वाटतो.



    2020 मध्ये गलवान संघर्षात सहभागी असलेल्या कमांडर की फाबाओ कडे चीनने खेळांच्या टॉर्च रिलेमधील मशाल सुपूर्द केल्याच्या वृत्तानंतर भारताने हिवाळी ऑलिंपिकवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. भारताशिवाय अमेरिकेसह अनेक देशांनी हिवाळी ऑलिम्पिकवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. फॅबाओ बुधवारी टॉर्च रिलेमध्ये सहभागी झाले होते. गुरुवारी भारताने या खेळांवर राजनैतिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

    फॅबाओ हे चीनच्या पीपल्स लिबरेशन आमीमध्ये रेजिमेंट कमांडर आहेत. 15 जून 2020 रोजी, लडाखच्या गलवान खोऱ्यातील संघर्षादरम्यान ते गंभीर जखमी झाले आणि भारतीय सैनिकांनी त्यांना पकडले. नंतर त्यांना चीनकडे सुपूर्द करण्यात आले. डिसेंबरमध्ये त्यांनी चीनच्या सरकारी टीव्ही चॅनलला प्रायोजित मुलाखत दिली.

    यामध्ये त्यांनी गलवान व्हॅलीची घटना सांगितली. फॅबाओ म्हणाले मी पुन्हा सीमेवर जाण्यास तयार आहे. आमची एक इंचही जमीन आम्ही कुणाला देणार नाही. चिनी सैन्याने त्यांना शौर्य पुरस्कारही दिला.5 मे 2020 रोजी गलवान संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले होते.

    अमेरिकेसह जगातील अनेक मीडिया हाऊसने गलवान व्हॅलीमध्ये 40 चिनी सैनिक मारले गेल्याचे सांगितले होते. तथापि, शी जिनपिंग सरकारने चिनी सैन्याने, पीपल्स लिबरेशन आर्मीकडून ठार झालेल्या सैनिकांची अचूक संख्या कधीही दिली नाही.

    गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये, चीनी ट्रॅव्हल ब्लॉगर ली किजियान यांनी गलवानवर चीनच्या खोट्या गोष्टींचा पदार्फाश केला होता. चीनमधील कांगवाक्सी येथे भारतीय सैनिकांनी मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कबरींना भेट देऊन किजियान यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. पिशान काउंटीमधील न्यायालयाने नंतर किजियानला शहीदांचा अपमान केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याला 7 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तो सध्या तुरुंगात आहे.

    India responds sharply to China’s arrogance: Ambassador to boycott Olympics

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!