विशेष प्रतिनिधी
मुंबई : ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहिमेअंतर्गत आखाती देशातून ५४ टन ऑक्सिजन घेऊन आलेली आयएनएस तलवार ही पहिली युद्धनौका मंगलोर बंदरात दाखल झाली.India recived oxygen from gulf countries
भारतात सध्या कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सीजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहेकोरोना रुग्णांच्या साह्यासाठी मित्रदेशांमधून द्रवरूप ऑक्सिजन आणि अन्य आवश्यक वैद्यकीय सामुग्री आणण्यासाठी `ऑपरेशन समुद्र सेतू २` मोहीम सुरू करण्यात आळी आहे.
त्यात सध्या नौदलाच्या नऊ युद्धनौका कुवेतपासून सिंगापूरपर्यंत तैनात असून तेथून त्या ऑक्सिजन व अन्य मदतसामुग्री घेऊन भारतात येणार आहेत.
आज आयएनएस तलवार ही युद्धनौका बहरीनवरून
ऑक्सिजन घेऊन मंगलोरमध्ये आली. एरावत युद्धनौका लवकरच सिंगापूरहून, तर कोलकाटा ही युद्धनौका कुवेतवरून येणार आहे. कुवेत आणि दोहा येथून तीन युद्धनौका लवकरच भारतात येणार आहेत. जलाश्व ही युद्धनौका आग्नेय आशियात असून गरज भासल्यास तीही या कामगिरीवर पाठवली जाणार असल्याचे नौदलाच्या सूत्रांनी सांगितले.
India recived oxygen from gulf countries
महत्त्वाच्या बातम्या
- ८० कोटी नागरिकांना माणशी पाच किलो धान्य मोफत, गरीब कल्याण योजनेला केंद्रीय मंत्रीमंडळाची मान्यता
- मद्यामुळे कोरोनापासून बचाव ही अफवाच, जनतेने त्याला बळी न पडण्याचे तज्ञांचे आवाहन
- मराठा आरक्षणाच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी झटकली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका
- अहो आश्चर्यम् ! मालीच्या महिलेने मोरोक्कोमध्ये नोनूप्लेट्सला जन्म दिला ; म्हणजेच ९ बेबीज