विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये २०२३ पासून २० टक्के इथेनॉल मिसळण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत दोन वर्षे अलीकडे आणली आहे.
गेल्या वर्षी केंद्राने २०२२ पर्यंत १० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोलचे लक्ष्य ठेवले होते. त्याचप्रमाणे, २०३० पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे उद्दिष्टही ठेवले होते. India needs one core ethanol
देशाला पेट्रोलमध्ये मिसळण्यासाठी २०२३ पर्यंत एक कोटी लिटर इथेनॉल लागेल. देशभरातील साखर कारखान्यांकडून इथेनॉल निर्मितीसाठी ६० लाख टन साखर पुरविली जाईल. यातून ७० लाख लिटर इथेनॉल तयार होईल. उर्वरित इथेनॉल अतिरिक्त धान्यापासून मिळेल.
भारतीय मानक ब्युरोच्याच्या दर्जानुसार देशातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना २० टक्क्यांपर्यत इथेनॉल मिसळलेले पेट्रोल विकण्याची सूचना केंद्र सरकाने तेल कंपन्यांना केली आहे. तेल मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली असून १ एप्रिल २०२३ पासून याची अंमलबजावणी होणार आहे, असेही त्यात म्हटले आहे.
India needs one core ethanol
Apps That Track Additional Costs.
महत्त्वाच्या बातम्या
- सीबीआय अधिकाऱ्यांना ड्रेस कोड, जीन्स, टीशर्ट, स्पोर्टस शूज चालणार नाहीत, नवनिर्वाचित संचालक सुबोध जयस्वाल यांचा आदेश
- लक्षद्विपचे प्रशासक बनणार असल्याच्या वृत्ताचा मेट्रोमॅन ई श्रीधरन यांनी केला इन्कार
- WATCH : ठाकरे सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि अनेक सुपर मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी
- WATCH : या वर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक