• Download App
    महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्लीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ शक्य। India Monsoon Update : Warning Of Heavy Rain In These States In The Next 24 Hours Alert Issued

    महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, दिल्लीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ शक्य

    पुढच्या २४ तासांत या राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा, अलर्ट जारी


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत मुसळधार पावसाने महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांना झोडपून काढले आहे. महाराष्ट्रात दरड कोसळून घडलेल्या दुर्घटनेने मात्र अनेकांची झोप उडवलीय. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने देशातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही राज्यांना धोका टाळण्यासाठी अलर्टही करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, आज झारखंड आणि बिहारमध्ये बेफाम पावसाची शक्यता आहे. राजधानी दिल्लीतही मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो. India Monsoon Update : Warning Of Heavy Rain In These States In The Next 24 Hours Alert Issued

    आयएमडीच्या म्हणण्यानुसार, २६ ते २८ जुलै दरम्यान हिमाचल प्रदेश, हरयाणा यांसहीत उत्तर प्रदेशातही पाऊस दाणादाण उडवून देऊ शकतो. २७ ते २८ जुलै दरम्यान पंजाब, पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाचा जोर दिसून येण्याची चिन्हे आहेत. २७ ते २८ जुलै दरम्यान हिमाचल आणि उत्तराखंडातही पावसाचं उग्र रूप पाहायला मिळू शकते.



    उत्तर प्रदेशातील काही भागांत येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या प्रशासनाला अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही भागांत हलका – मध्यम पाऊसही पडू शकतो.
    ​दिल्लीत जोरदार वाऱ्याची शक्यता

    आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीच्या वेगवेगळ्या भागांत हलक्या पावसासोबत तापमानात घट दिसून येऊ शकते. या दरम्यान हवेचा वेग ३० ते ४० किलोमीटर प्रति तास असू शकतो. राजधानी दिल्लीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

    ​बिहारमध्ये येलो – ऑरेंज अलर्ट

    बिहारमध्येही येत्या २४ ते ४८ तासांत मोठ्या पावसाची शक्यता आहे. उत्तर आणि दक्षिण भागात पावसासोबत वीजांच्या कडकडाटही दिसून येऊ शकतो. राज्याला २६ ते २९ जुलैपर्यंत येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    India Monsoon Update : Warning Of Heavy Rain In These States In The Next 24 Hours Alert Issued

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!