New Record In Corona Vaccination : कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लसींची उपलब्धता सुनिश्चित तर केली आहेच शिवाय वेगाने लसीकरणही केले जात आहे. शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 93 लाखांहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याची माहिती दिली. India Makes New Record In Corona Vaccination today administers historic More than 93 lakh vaccines
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असतानाच मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सरकारने लसींची उपलब्धता सुनिश्चित तर केली आहेच शिवाय वेगाने लसीकरणही केले जात आहे. शुक्रवारी एका दिवसात विक्रमी 90 लाखांहून जास्त कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी स्वत: याची माहिती दिली.
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी एका दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात लसीकरणाबद्दल ट्विट करताना म्हटले, “नागरिकांचे अभिनंदन, भारतात आतापर्यंत 90 लाखांहून अधिक लस डोस देण्यात आले आहेत. ऐतिहासिक.”
राज्यांमध्ये लसीचे 4.05 कोटींपेक्षा जास्त डोस
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, कोविडविरोधी लसीचे 4.05 कोटीहून अधिक डोस अजूनही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 58.86 कोटींहून अधिक डोस लस देण्यात आले आहेत आणि त्यांना 17.64 लाखांहून अधिक डोस पोहोचवले जात आहेत.
मंत्रालयाने म्हटले की, लसीसाठी 4.05 कोटींपेक्षा जास्त न वापरलेले डोस अद्याप राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उपलब्ध आहेत. केंद्र सरकार कोविड लसीकरणाच्या अभियानाला गती देण्यासाठी आणि देशभरात त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. याचाच भाग म्हणून नवनवीन लसींना आणि चाचण्यांना मंजुरी दिली जात आहे.
India Makes New Record In Corona Vaccination today administers historic More than 93 lakh vaccines
महत्त्वाच्या बातम्या
- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने महाविद्यालय, वाजपेयी-जेटली यांच्या नावांनीही केंद्रांची उभारणी
- ओबीसी राजकीय आरक्षण बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मांडल्या सूचना… कोणत्या?… त्या वाचा…!!
- देशाचा जीडीपी 9.5% राहण्याचा अंदाज, महागाईसुद्धा कमी होणार – RBI गव्हर्नर शक्तिकांत दास
- Sarada Scam : शारदा घोटाळ्याच्या आरोपपत्रात तृणमूल सरचिटणीस कुणाल घोष यांचे नाव, घोष म्हणाले- केंद्राकडून सूड भावनेने कारवाई
- WATCH : काबूल विमानतळ स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ, रक्ताचे वाहिले पाट, चहुकडे विखुरले मृतदेह, 110 जणांचा मृत्यू