• Download App
    India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू । India Corona Cases Updates today more than 4 lakh patients recoreded read details

    India Corona Cases Updates : देशात सलग दुसऱ्या दिवशी ४ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद, मागच्या १० दिवसांत दर तासाला १५० मृत्यू

    India Corona Cases Updates :  भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक बनली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 4,14,188 नवीन रुग्ण आढळले असून 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 3 लाख 31 हजार 507 जणांनी कोरोनोला पराभूत केले आहे. India Corona Cases Updates today more than 4 lakh patients recoreded read details


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारतातील कोरोना संक्रमणाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक बनली आहे. दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 4,14,188 नवीन रुग्ण आढळले असून 3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 3 लाख 31 हजार 507 जणांनी कोरोनोला पराभूत केले आहे. आयसीएमआरने अशी माहिती दिली आहे की, कालपर्यंत कोरोनाच्या एकूण 29,86,01,699 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. यापैकी काल 18,26,490 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

    10 दिवसांत दर तासाला 150 मृत्यू

    मागच्या 10 दिवसांपासून दररोज तीन हजारांहून जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. अशा प्रकारे 10 दिवसांत एकूण 36,110 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच दर तासाला 150 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.

    महाराष्ट्रात 853 जणांचा मृत्यू

    महाराष्ट्रातही मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाहीये. मागच्या 24 तासांत राज्यात 853 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि दिल्लीमध्ये मृत्यूंचा आकडा 300 हून जास्त आहे. छत्तीसगडमध्ये 200 हून जास्त जणांचा जीव गेला.

    एकूण कोरोना रुग्णसंख्या – 2 कोटी 14 लाख 91 हजार 598
    एकूण बरे झालेले रुग्ण – 1 कोटी 72 लाख 12 हजार 351
    एकूण मृत्यू – 2 लाख 34 हजार 83
    सक्रिय रुग्णसंख्या – 36 लाख 45 हजार 164
    एकूण लसीकरण – 16 कोटी 49 लाख 73 हजार 58

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, देशभरात कोरोना लसीकरणात आतापर्यंत 16,48,76,248 कोटी डोस देण्यात आले आहेत. काल सायंकाळी 8 वाजेपर्यंत 18-44 वयोगटातील 2.62 लाखांहून अधिक लाभार्थींना लस देण्यात आली आहे.

    देशातील अनेक भागांत 40 ऑक्सिजन एक्स्प्रेस गाड्यांद्वारे 2,511 टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजनची वाहतूक केली जात असल्याची माहिती रेल्वेने दिली. एक्स्प्रेस गाड्यांमध्ये 161 टँकरद्वारे हे ऑक्सिजन देण्यात आल्याचे रेल्वेने गुरुवारी सांगितले. यासह 400 टनांहून अधिक ऑक्सिजनची वाहतूक होत आहे.

    India Corona Cases Updates today more than 4 lakh patients recoreded read details

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!