विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिव्हिर आणि लशींचा तुटवडा, आरोग्य सेवकांची कमतरता जाणवत आहे. भारतातील कोरोनाच्यार दुसऱ्या लाटेच्या उद्रेकाचे कारण म्हणजे साथ संपुष्टात आल्याचा भारताचा चुकीचा अंदाज आणि सर्व व्यवहार वेळेपूर्वी सुरू करणे, हे असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचे मुख्य वैद्यकीय सल्लागार आणि साथरोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फौसी यांनी म्हटले आहे. India cant recognize second wave
कोरोनाचा पहिला टप्पा म्हणजे वास्तवात एक लाट होती. पण त्यानंतर कोरोनाची साथ संपल्याचे चुकीचे अनुमान काढून भारताने सर्व निर्बंध वेळेपूर्वी हटविण्यास सुरुवात केली. ही घाईमुळेच दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम भारतात पाहायला मिळत आहेत, असे डॉ. फौसी यांनी कोरोना प्रतिसादावरील चर्चेदरम्यान सिनेटच्या आरोग्य, शिक्षण, कामगार आणि निवृत्तीवेतन समितीसमोर सांगितले.
भारतावरून अमेरिकेलाही धडे मिळाले, असल्याचा सूर चर्चासत्रात उमटला. त्यानुसार डॉ. फौसी यांनी पुढील मुद्यांवर भर देण्याची सूचना केली. कोणतीही परिस्थिती कमी लेखू नये. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी देणे आवश्यक आहे. जागतिक साथकाळात स्वतःच्या देशापलीकडे विचार करीत अन्य देशांना सहकार्य करावे. अशा काळात विशेषतः जगभरातील लसीकरणासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
या चर्चासत्राच्या अध्यक्षा व सिनेटर पॅटी मुरे म्हणाल्या की, कोरोनामुळे भारतात निर्माण झालेली भयानक स्थितीमुळे एक दुःखदायक वास्तव समोर येत आहे, ते म्हणजे सर्व ठिकाणी झालेला कोरोनाचा प्रादुर्भाव जोपर्यंत आटोक्यात येत नाही, तोपर्यंत अमेरिका ही जागतिक साथ संपुष्टात आणू शकत नाही.
India cant recognize second wave
महत्त्वाच्या बातम्या
- Project Heal India : किरण खेर आजारी असुनही अनुपम खेर यांचा मदतीसाठी पुढाकार ; वैद्यकीय उपकरणांची पहिली खेप अमेरिकेतून दाखल
- सोनियांसह १२ नेत्यांचा मोदींच्या दिशेने “पत्रबाण”; ज्या केंद्रावर टीकास्त्र त्याच्याचकडे नऊ कलमी मागण्याही… पण पत्राचे खरे रहस्य काय??
- कोरोना संक्रमणातही भारताच्या औद्योगिक उत्पादनांची गरुडभरारी ; 22.4 टक्के वाढ
- महाराष्ट्राने १८ ते ४५ वयोगटाचे लसीकरण थांबविले; लॉकडाऊन १५ दिवसांनी वाढविण्याची राज्य मंत्रिमंडळाची शिफारस
- उरळी कंचनला चोरीच्या कारमधून पेट्रोल पंपावर दरोड्याचा प्रयत्न; चार जणांच्या टोळीला अटक