• Download App
    सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म|In the slums of Panchsheelnagar in Sangli Four houses were gutted in a gas cylinder explosion

    सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : येथील पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले.In the slums of Panchsheelnagar in Sangli Four houses were gutted in a gas cylinder explosion

    शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कामानिमित्त या घरातील कुटुंबे बाहेर गेली असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे चार बंब दाखल झाले. त्यांनी आग आणण्याचा आटोकाट प्रयत्न केले.



    या ठिकाणी रेस्क्यू करत असताना अग्निशमन दलातील अधिकारी विजय पवार यांच्यासह चौघे जखमी झाले. यातील फायरमन रामचंद्र चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली असून ते २५ टक्के भाजले आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. गॅसचा स्फोटात परिसरातील काही घरे हादरून गेली होती.

    स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. शांतिनिकेतन कॉलेजच्या शेजारी मेंडगुळे वस्ती आहे. याठिकाणी असणाऱ्या रेल्वे रूळ शेजारीच ओपन स्पेसमध्ये झोपडपट्टी आहे. याठिकाणी अनके पत्र्यांची छोटी घरे वसली आहेत. शुक्रवारी या वस्तीतील नंदकुमार जावीर यांच्या घरात गॅस लिकेज झाला. यामध्ये शॉर्टसर्किट होऊन भीषण आग लागली.

    In the slums of Panchsheelnagar in Sangli Four houses were gutted in a gas cylinder explosion

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य