वृत्तसंस्था
नवी दिल्ली – भारताच्या सीमा सुरक्षा दलाच्या Borde Security Force कारवाईत तेजी आली असून BSF च्या कारवायांची तपशीलवार माहिती सीमा सुरक्षाचे दलाचे महासंचालक DG राकेश अस्थाना यांनी दिली आहे. In the India-Bangladesh border, 3,984 infiltrators have been arrested & 12 smugglers/infiltrators have been killed in encounters.
भारत – बांगलादेश बॉर्डरवर गेल्या वर्षभरात ३९८४ घुसखोरांना पकडण्यात आले असून १२ घुसखोरांना आणि तस्करांना सुरक्षा दलांनी ठार मारले आहे. या बॉर्ड़रवर घुसखोरीचे प्रमाण अधिक असून त्यांच्या विरोधातील कारवायांमध्ये तेजी आली आहे. य़ाच बॉर्डरवर घुसखोरांकडून १२,८८१ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून त्याची एके सिरिज ६१ रायफल्स आणि ७९७६ गोळ्याही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच २५ लाखांच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
भारत पाकिस्तान बॉर्डरवर सीमा सुरक्षा दलांनी ६३२ किलो अमली पदार्थ घुसखोरांकडून जप्त केले असून ५५ रायफल्स, ४२३३ गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांची आणि घुसखोरांची ४ भुयारे नष्ट करण्यात आली असून ६१ ड्रोन्सही पकडली आहेत. अलीकडेच घुसखोरांनी ड्रोनचा वापर करून भारतीय बाजूकडे ड्रग्ज, शस्त्रे आणि दारूगोळा पाठविण्याचा प्रयत्न केला. पण तो सीमा सुरक्षा दलाने हाणून पाडला, अशी माहिती राकेश अस्थाना यांनी दिली.+
In the India-Bangladesh border, 3,984 infiltrators have been arrested & 12 smugglers/infiltrators have been killed in encounters.