• Download App
    राजस्थानात काँग्रेसच्या आरोग्यमंत्र्यांचा “हम दो हमारा एक”चा नारा; लोकसंख्या नियंत्रण धोरणाला पाठिंबा|In Rajasthan, the slogan of the Congress Health Minister is "Hum Do Hamara Ek"; Support population control policy

    राजस्थानात काँग्रेसच्या आरोग्यमंत्र्यांचा “हम दो हमारा एक”चा नारा; लोकसंख्या नियंत्रण धोरणाला पाठिंबा

    वृत्तसंस्था

    जयपूर : आसाम आणि उत्तर प्रदेशातून सुरूवात झालेल्या लोकसंख्या नियंत्रण धोरणावरून देशभर राजकीय चर्चा रंगू लागली आहे. दोन भाजपशासित राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण धोरणाची सुरूवात केल्यामुळे त्याला मुसलमान विरोधी रंग देण्याचा प्रयत्न काही ठिकाणी झाला आहे.In Rajasthan, the slogan of the Congress Health Minister is “Hum Do Hamara Ek”; Support population control policy

    पण राजस्थानात मात्र काँग्रेसचे सरकार असूनही त्या विषयावर अनुकूल सूर उमटला आहे. राजस्थानच्या अशोक गेहलोत सरकारचे आरोग्यमंत्री डॉ. रघु शर्मा यांनी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. भारतात लोकसंख्या नियंत्रण धोरण आवश्यकच आहे. त्यासाठी आता हम दो हमारा एक हा नारा दिला पाहिजे, असे डॉ. रघू शर्मा म्हणाले आहेत.



    वाढती लोकसंख्या ही खरेच संपूर्ण देशाला भेडसावणारी समस्या आहे. यावर देशात विचारमंथन झाले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी काही चांगल्या जीवनाची शाश्वती ठेवायची असेल, तर लोकसंख्या नियंत्रण केलेच पाहिजे. आपला या पुढचा नारा हम दो हमारा एक हा असला पाहिजे, असे डॉ. रघू शर्मा यांनी स्पष्ट केले.

    In Rajasthan, the slogan of the Congress Health Minister is “Hum Do Hamara Ek”; Support population control policy

    Related posts

    West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न