विशेष प्रतिनिधी
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत चौरंगी लढत होणार असली तरी भारतीय जनता पक्षाचीच सत्ता पुन्हा येणार असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. गेल्या वेळी सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या कॉँग्रेसची जागा यंदाच्या वेळी आप घेणार आहे. गोव्यात प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल कॉँग्रेसला दोन टक्यांहून कमी मते मिळण्याचा अंदाज आहे.In Goa, BJP is in power again, AAP will be the main opposition party, Trinamool in the box, Congress in the fray
निवडणुकीपूर्वी झालेल्या जनमत चाचण्यांमध्ये येथे पुन्हा भाजपचे सरकार स्थापन होताना दिसत आहे. दुसरीकडे, आम आदमी पार्टी इथे किंगमेकर ठरू शकते. मागच्या निवडणुकीत ‘आप’ने खातेही उघडले नव्हते. आम आदमी पार्टीला (आप) इथे ७ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे ‘आप’ प्रमुख विरोधी पक्षही बनू शकतो.
टाइम्स नाऊ नवभारतच्या जनमत सर्वेक्षणानुसार आज निवडणूक झाल्यास भाजपला १८ ते २२ जागा मिळू शकतात. २०१७ मध्ये भाजपने निवडणुकीत १३ जागा जिंकल्या होत्या. गेल्या निवडणुकीत येथे ‘आप’ने खातेही उघडले नव्हते. मात्र, यावेळी ‘आप’ला ७-११ जागा मिळू शकतात. गेल्या वेळी सर्वाधिक १७ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला ४-६ जागा मिळू शकतात.
दुसरीकडे, राज्यात जोरदार प्रचार करणाºया आणि गेल्या काही महिन्यांत इतर पक्षांतील अनेक नेत्यांना सामील करून घेणाऱ्या टीएमसीला फक्त २ टक्के मते मिळतील, असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे.गेल्या वेळी सर्वात मोठा पक्ष असूनही काँग्रेस सरकार स्थापन करू शकली नाही.
यावेळी काँग्रेस केवळ ४ ते ६ जागांपर्यंत मर्यादित राहिल, असे दिसतेय. काँग्रेसमधील अनेक नेते आणि आमदार पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये, विशेषत: टीएमसीमध्ये गेले आहेत. उमेदवारी जाहीर होऊनही एक आमदार ममतांच्या पक्षात गेला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी धडपडत आहे. गेल्या महिन्यात, काँग्रेसने गोवा फॉरवर्ड पार्टीसोबत युती केली. हा पक्ष यापूर्वी भाजपसोबत सत्तेत भागीदार होता.
अरविंद केजरीवाल यांचा पक्ष पंजाबबरोबरच गोव्यातही जोरदार काम करत आहे. अलिकडे केजरीवाल यांनी येथील महिलांसाठी मोठी आश्वासने दिली आहेत. दिल्लीप्रमाणे इथेही आम आदमी पाटीर्ने अनेक गोष्टी मोफत करण्याची घोषणा केली आहे. २०१७ मध्ये आप इथे खातेही उघडू शकली नाही. पण यावेळी ‘आप’ किंगमेकर बनण्याच्या तयारीत आहे.
In Goa, BJP is in power again, AAP will be the main opposition party, Trinamool in the box, Congress in the fray
महत्त्वाच्या बातम्या
- Mhada Exam : गोंधळ मिटता मिटेना ! म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर ; 29-30 जानेवारीला परीक्षा नाही
- PUSHPA : पुष्पाने केले अनेक रेकॉर्ड ब्रेक ; ३०० कोटींच्या क्लबमध्ये सिनेमा सामिल
- पुण्यात येत्या आठवड्यापासून गुंठेवारी नियमितीकरण; महापालिका प्रशासनाचे महापौरांना सादरीकरण
- आता लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना कोरोनाची लागण