• Download App
    जर्मनीच्या चान्सलरी समोर मोदींचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात मराठी मंडळींकडून स्वागत!!In front of the German Chancellor, Modi was welcomed by Marathi congregations in the guise of Chhatrapati Shivaji Maharaj

    Modi in Germany : जर्मनीच्या चान्सलरी समोर मोदींचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात मराठी मंडळींकडून स्वागत!!

    वृत्तसंस्था

    बर्लिन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 दिवसांच्या युरोप दौऱ्यावर पहिल्या देशात जर्मनी पोहोचले. जर्मनी त्यांनी चान्सलर शूल्ज यांची भेट घेतली. त्यावेळी जर्मन चान्सलरी समोर म्हणजे जर्मन पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर मराठी मंडळींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशात आणि पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात मोदींचे स्वागत केले. एएनआय या वृत्तसंस्थेने या स्वागताचे फोटो ट्विट केले आहेत. In front of the German Chancellor, Modi was welcomed by Marathi congregations in the guise of Chhatrapati Shivaji Maharaj

    कोरोना काळानंतर म्हणजे तब्बल 2 वर्षांनंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला परदेश दौरा आहे. त्यामुळे परदेशातल्या भारतीयांमध्ये जबरदस्त उत्साह पसरला आहे. त्यांनी पारंपारिक पोशाखांमध्ये मोदींचे स्वागत स्वागत केले आहे. यात बर्लिन मधील मराठी मंडळींनी ढोल-ताशांच्या गजरात मोदींचे स्वागत केले. त्यावेळी एक मराठी तरुण छत्रपती शिवाजी महाराजांचा विशेष करून आवर्जून मोदींच्या स्वागतासाठी आला होता.

    बर्लिनमध्ये शेकडो भारतीयांनी मोदींचे विमानतळावर तसेच प्रत्यक्ष जर्मन पंतप्रधानांच्या कार्यालयासमोर जोरदार स्वागत केले. मोदींनी भारतीयांशी संवाद साधला. लहान मुलांनी त्यांच्या समोर देशभक्तीपर गीते सादर केली. त्यावेळी त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. त्याचबरोबर जर्मनीतल्या भारतीय दूतावासातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी देखील पंतप्रधानांबरोबर फोटोसेशन केले.

    In front of the German Chancellor, Modi was welcomed by Marathi congregations in the guise of Chhatrapati Shivaji Maharaj

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    GST Collection जुलैमध्ये GST संकलन 1.96 लाख कोटी रुपये; गतवर्षीच्या तुलनेत 7.5% वाढ; जूनमध्ये GST मधून 1.85 लाख कोटी

    National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर : शाहरुख खान आणि विक्रांत मॅसी सर्वोत्तम अभिनेता, राणी मुखर्जी सर्वोत्तम अभिनेत्री, ‘१२वी फेल’ सर्वोत्कृष्ट चित्रपट

    Donald Trump : थायलंडसोबतचा सीमासंघर्ष थांबवल्याबद्दल कंबोडियाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस; पाकिस्ताननंतर कंबोडियाचा दुसरा पाठिंबा