• Download App
    Andhra Pradesh Local Body Poll Results : आंध्र प्रदेशात जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने १३ जिल्हा परिषदा जिंकल्या,९० टक्के पंचायत समित्या ताब्यात । In Andhra Pradesh, Jagan Reddy's YSR Congress wins 13 Zilla Parishads, holds 90 per cent Panchayat Samiti

    Andhra Pradesh Local Body Poll Results : आंध्र प्रदेशात जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने १३ जिल्हा परिषदा जिंकल्या,९० टक्के पंचायत समित्या ताब्यात

    वृत्तसंस्था

    अमरावती : आंध्र प्रदेशमध्ये नुकत्याच झालेल्या जिल्हा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत जगन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाने १३ जिल्हा परिषदेच्या जागा जिंकल्या असून ९० टक्के पंचायती ताब्यात घेतल्या आहेत. In Andhra Pradesh, Jagan Reddy’s YSR Congress wins 13 Zilla Parishads, holds 90 per cent Panchayat Samiti

    आंध्र प्रदेश राज्यात अनेक प्रयत्न करुनही भारतीय जनता पक्ष हवा तसा पाय रोवू शकलेला नाही. जगन रेड्डी यांच्या लाटेसमोर भाजपला आणि सहयोगी जन सेना पक्षाला एकही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताब्यात घेता आलेली नाही.



    आंध्र प्रदेशमध्ये जिल्हा परिषद क्षेत्रीय मतदारसंघ निवडणुकीत जगन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीत मुसंडी मारली आहे. तर भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष जन सेना यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही.

    जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ५१५ जागांवर तर पंचायत समितीसाठी ७७२० जागांसाठी ८ एप्रिलला मतदान झाले होते. निकाल १० एप्रिल रोजी घोषीत होणार होते. मात्र, तेलुगु देशम पार्टी आणि भाजपने आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात निवडणूक संदर्भात याचिका दाखल केली होती. त्यात म्हंटले होते की, निवडणुकीत आदर्श आचार संहितेचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे मतमोजणी रोखली होती. मात्र, अखेर न्यायालयाच्या खंडपीठाने मत मोजणीस मान्यता दिली. रविवारी मतमोजणीचे निकाल हाती आले.

    निकाल पुढीलप्रमाणे आहेत

    • जिल्हा परिषदेच्या एकूण जागा : ५५३
    • वायएसआर काँग्रेसने ५४७ जिंकल्या
    • पंचायत समितीचा निकाल
    • वायएसआर कांग्रेसने ७२८४ जागा जिंकल्या
    • भाजप आणि त्यांचा सहकारी पक्ष सहयोगी जन सेना जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा मिळवू शकला नाही.
    • दोन्ही निवडणुकात भाजपने २३ जागा जिंकल्या
    • दोन्ही निवडणुकात जन सेनाने ८५ जागा जिंकल्या

    In Andhra Pradesh, Jagan Reddy’s YSR Congress wins 13 Zilla Parishads, holds 90 per cent Panchayat Samiti

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य