• Download App
    हार्वर्ड विद्यापीठ जगात पहिले, भारतात आयआयएम अहमदाबाद टॉपर|IIM Ahmadabad is topper in India

    हार्वर्ड विद्यापीठ जगात पहिले, भारतात आयआयएम अहमदाबाद टॉपर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : सेंटर फॉर वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकींगने जागतिक विद्यापीठ क्रमवारी-२०२१/२२ जारी केली असून त्यामध्ये दर्जाच्या बाबतीत देखील भारतीय विद्यापीठे आघाडीवर आहेत.IIM Ahmadabad is topper in India

    जागतिक पातळीवर हार्वर्ड विद्यापीठाने या क्रमवारीध्ये पहिले स्थान मिळवले असून त्यानंतर मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ यांचा क्रमांक लागतो.



    या क्रमवारीमध्ये आयआयएम- अहमदाबादला ४१५ स्थान मिळाले असून त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएसी) ४५९ व्या स्थानी आहे. या पाहणीत जगभरातील २००० संस्थांचा समावेश होता. त्यात ६८ भारतीय संस्थांना स्थान मिळाले आहे.

    देशातील दहा आघाडीच्या संस्था पुढीलप्रमाणे. कंसात त्यांचे क्रमवारीतील स्थान. आयआयएम अहमदाबाद (४१५), आयआयएससी, बंगळूर (४५९) टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई (५४३), आयआयटी मद्रास (५५७),

    आयआयटी, मुंबई (५६७), दिल्ली विद्यापीठमाण (५७१), आयआयटी दिल्ली (६२३),आयआयटी खरगपूर (७०८), पंजाब विद्यापीठ (७०९), आयआयटी कानपूर (८१८)
    या क्रमवारीमध्ये झळकलेल्या

    अन्य संस्थांमध्ये जेएनयू, बनारस हिंदू विद्यापीठ, आयआयटी रूरकी, आयआयटी गुवाहाटी, एम्स नवी दिल्ली, जादवपूर आणि कोलकता विद्यापीठ आणि वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे.

    IIM Ahmadabad is topper in India

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट