• Download App
    उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही तर...; शिवसेनेचे 11 खासदार अमित शहांना भेटलेच आहेत!! |If Uddhav Thackeray did not listen ...; 11 Shiv Sena MPs have already met Amit Shah !!

    उद्धव ठाकरेंनी ऐकले नाही तर…; शिवसेनेचे 11 खासदार अमित शहांना भेटलेच आहेत!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणूकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ऐकले नाहीच तर…शिवसेनेतील 40 आमदार एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.If Uddhav Thackeray did not listen …; 11 Shiv Sena MPs have already met Amit Shah !!

    आता अशीच फूट शिवसेनेत संसदेतही पडणार, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण शिवसेनेचे 11 खासदार हे भाजपाचे नेते गृहमंत्री अमित शहा यांना आधीच भेटले आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेत दिल्लीच्या पातळीवर फूट पडली तर शिवसेनेत ही उभी फूट पडल्याचे सिद्ध होईल.



    द्रौपदी मुर्मूंना मतदानासाठी व्यूहरचना 

    काल सोमवारी, ११ जुलै रोजी दुपारी ‘मातोश्री’मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीनंतर शिवसेना नेते संजय राऊत बाहेर आले आणि माध्यमांशी काहीही न बोलता तडक निघून गेले. या बैठकीत खासदार आणि संजय राऊत यांच्याल खडाजंगी झाल्याचे समजते. ही माहिती येत असतानाच आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली. शिवसेनेच्या खासदारांनी या आधीच अमित शहा यांची भेट घेतली आहे.

    गृहमंत्री अमित शहा हे कृष्णा मेनन या निवासस्थानात राहतात. या निवासस्थानाला एकूण तीन प्रवेशद्वार आहेत. यापैकी मुख्य प्रवेशद्वार हे मेनन रोडवर आहे, तर या निवासस्थानाला एक मागील प्रवेशद्वार देखील आहे. तसेच एक मधले प्रवेशद्वार देखील आहे. याच मागच्या प्रवेशद्वारातून शिवसेनेचे एकूण 11 खासदार गृहमंत्री अमित शहा यांना भेटले, अशी माहिती सांगितली जात आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या खासदारांबरोबर गृहमंत्र्यांनी सविस्तर चर्चा केल्याची सूत्रांची माहिती आहे. 18 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मुर्मू यांच्या बाजूने मतदान करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यूहरचना केल्याची सूत्रांची माहिती आहे.

    If Uddhav Thackeray did not listen …; 11 Shiv Sena MPs have already met Amit Shah !!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??