विशेष प्रतिनिधी
अमरावती : माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे, अशी टीका महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे. तर कितीही काहीही केलं तरी वय दिसणारच असा टोला राणा यांनी ठाकूर यांना लगावला आहे.If a person is sweet work should be sweet, Yashomati Thakur criticizes Navneet Rana
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावरुन अमरावतीमध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि खासदार नवनीत राणा या दोन महिला प्रतिनिधींमध्ये वाद उफाळून आला आहे. ठाकूर यांच्यावर टीका करताना
खासदार नवनीत राणा यांनी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या वयाचा उल्लेख केला होता. कितीही काही केलं तरी तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे दिसणारच. माझ्यापेक्षा 10 ते 15 वर्षांनी मोठ्या आहेत. तेवढं वय दिसणारच.
यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले आहे की, माझ्या पायाला ज्या भेगा पडल्या आहेत, हातावर घट्टे आणि चेहऱ्यावरील खड्डे हेच शेतकऱ्याच्या मुलीचं खरं सौंदर्य आहे. त्यामुळे माणूस गोड असून चालत नाही तर त्याचं काम गोड असलं पाहिजे.
If a person is sweet work should be sweet, Yashomati Thakur criticizes Navneet Rana
महत्त्वाच्या बातम्या
- RUSSIA-UKRAINE WAR : युक्रेनमध्ये ठार झालेल्या नवीनच्या कुटुंबीयांचं मोदींकडून सांत्वन; पंतप्रधानांनी बोलावली तातडीची बैठक
- किरीट सोमय्यांच्या मुलगा नील सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
- रक्ताच्या वारसदारांकडून दलितांची दिशाभूल; आंबेडकर यांचे नाव न घेता डॉ. राऊत यांचा हल्ला
- महावितरणकडून विलासराव देशमुख अभय योजनेची घोषणा थकित रकमेत सवलत, पुन्हा वीज जोडणी देणारी नवी योजना