• Download App
    कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली; पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास लगेच राजीनामा; येडियुरप्पांचे स्पष्ट वक्तव्य।I will resign the day party high command asks me to quit: Karnataka Chief Minister BS Yediyurappa

    कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचाली; पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास लगेच राजीनामा; येडियुरप्पांचे स्पष्ट वक्तव्य

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू : कर्नाटकात मोठ्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुरप्पांचे महत्त्वाचे वक्तव्य आले आहे. I will resign the day party high command asks me to quit: Karnataka Chief Minister BS Yediyurappa

    कर्नाटकात पर्यायी नेतृत्व तयार होऊ शकत नाही, असे मला अजिबात वाटत नाही. भाजप पक्षश्रेष्ठींनी मला सांगितले की मी लगेच राजीनामा देईन, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. राज्यात भाजपच्याच काही आमदारांमध्ये येडियुरप्पांच्या नेतृत्वाबद्दल नाराजी आहे. गेल्या मंगळवारी येडियुरप्पांचे पुत्र बी. एस. विजयेंद्र यांनी दिल्ली दौरा करून वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.



    या भेटींवर भाजपचे वरिष्ठ आमदार बसनगौडा पाटील यत्नाळकर यांनी आक्षेप घेतला होता. कर्नाटकात येडियुरप्पांचे सरकार आहे, की बी. एस. विजयेंद्र यांचे सरकार आहे, असा सवाल बसनगौडांनी विचारला. विजयेंद्र सध्या प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष आहेत. त्यांना भाजपच्या काही आमदारांचा विरोध होतो आहे.

    बेल्लारीत जेएसड्ब्ल्यू समूहाला ३६६६ एकर जमीन १ लाख २० रूपये दराने देण्याच्या निर्णयाची दखल भाजप श्रेष्ठींनी घेतली आहे. कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचाही अहवाल मागविला आहे. याकडे बसनगौडा यांनी लक्ष वेधले. या राजकीय पार्श्वभूमीवर येडियुरप्पांनी आज राजीनामा देण्यासंबंधीचे वक्तव्य केले आहे. राज्यातील राजकीय पेचप्रसंगाच्या दृष्टीने ते गंभीर आहे.

    I will resign the day party high command asks me to quit: Karnataka Chief Minister BS Yediyurappa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tatanagar : आंध्र प्रदेशमध्ये टाटानगर-एर्नाकुलम एक्सप्रेसला आग, 1 जणाचा मृत्यू; 2 एसी डबे जळाले

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय