शहा म्हणाले, “हिंदी आणि आपल्या सर्व स्थानिक भाषांमध्ये कोणताही विरोधाभास नाही मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. आपली राजभाषा बळकट करण्याची गरज आहे.”I like Hindi more than Gujarati, you need to strengthen your official language – Amit Shah
विशेष प्रतिनिधी
वाराणसी : गृहमंत्री अमित शाह वाराणसीतील हस्तकला संकुल येथे अखिल भारतीय राजभाषा परिषदेला संबोधित करताना म्हणाले की, २०१९ मध्येच अखिल भारतीय राजभाषा परिषद दिल्लीबाहेर घेण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. कोरोनाच्या काळात आपण ते करू शकलो नाही, पण आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ही नवी शुभ सुरुवात होणार आहे याचा मला आनंद आहे.
अमृत महोत्सव हा देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्या लोकांच्या स्मृतींना उजाळा देऊन तरुण पिढीला प्रेरणा देण्यासाठीच नाही, तर ते आमच्यासाठी निर्धाराचे वर्ष आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते
अमित शाह म्हणाले की, आझादीच्या अमृत महोत्सवांतर्गत मी देशातील सर्व जनतेला आवाहन करू इच्छितो की, “स्वभाषेसाठीचे आपले एक ध्येय लक्षात ठेवा आणि ते आपल्या जीवनाचा एक भाग बनवा. हिंदी आणि आपल्या सर्व स्थानिक भाषांमध्ये कोणताही विरोधाभास नाही मला गुजरातीपेक्षा हिंदी भाषा जास्त आवडते. आपली राजभाषा बळकट करण्याची गरज आहे.”
जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या लिपी भाषा भारतात
पुढे शहा म्हणाले की, यापूर्वी हिंदी भाषेसाठी अनेक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र तो काळ आता संपला आहे. जगभरात आपल्या भाषां प्रस्थापित करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी अभिमानाने हाती घेतले आहे. जो देश आपली भाषा गमावतो, तो देश आपली सभ्यता, संस्कृती आणि मूळ विचारही गमावतो. जे आपली मूळ विचारसरणी गमावून बसतात ते जगाच्या प्रगतीत हातभार लावू शकत नाहीत. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या लिपी भाषा भारतात आहेत. त्यांना पुढे न्यायचे आहे.अस देखील शहा म्हणाले.
गृहमंत्रालयात इंग्रजीत लिहिलेली किंवा वाचलेली एकही फाईल नाही
शहा म्हणाले, भाषा जितकी मजबूत आणि समृद्ध असेल तितकी संस्कृती आणि सभ्यता अधिक व्यापक आणि शक्तिशाली असेल. आपल्या भाषेची जोड आणि आपली भाषा वापरताना कधीही लाज वाटू नये, ही अभिमानाची गोष्ट आहे.
‘मला अभिमानाने सांगायचे आहे की आज गृहमंत्रालयात इंग्रजीत लिहिलेली किंवा वाचलेली एकही फाईल नाही, आम्ही राजभाषा पूर्णपणे स्वीकारली आहे. अनेक विभागही या दिशेने वाटचाल करत आहेत.अस देखील अमित शहा म्हणले.
I like Hindi more than Gujarati, you need to strengthen your official language – Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- BHOPAL MP: वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन- हबीबगंज नव्हे-आता शेवटची हिंदू रानी ‘रानी कमलापति’ रेल्वे स्टेशन !पंतप्रधान मोदी करणार लोकार्पण; पहा फोटो
- कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून परिवहन विभागाने कंबर कसली ; भाविकांकरिता खासगी वाहनांची सोय
- पक्षीय राजकारण सोडा, अमरावती शांत करा; नवनीत राणा यांचा संजय राऊत, यशोमती ठाकूर यांना इशारा
- CANARA to KASHI :कॅनडा ते काशी ; १०९ वर्षांची प्रतिक्षा-मोदी सरकारचा प्रयास-अन् अन्नपूर्णा मातेची घर वापसी; जाणून घ्या देवीच्या प्रवासाची संपूर्ण कहाणी…