वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर पोटनिवडणुकीत आपल्या विजयाचे श्रेय बिगर बंगाली मतदारांना दिले आहे. आपण 58 हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्याचे असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या समर्थकांसह समोर बोलताना जाहीर केले. I have won the Bhabanipur Assembly bypolls with a margin of 58,832 votes and have registered the victory in every ward of the constituency: Chief Minister Mamata Banerjee in Kolkata
भवानीपूररकडे सगळ्या देशाचे लक्ष होते. भाजपने मला पराभूत करण्यासाठी जंग जंग पछाडले. विधानसभा निवडणुकीत मला जखमी केले. पण मी बंगाली वाघीण आहे. त्यामुळे मी लढून जिंकले आहे. माझ्या सरकारला हैराण करण्यासाठी भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला. संपूर्ण बंगालने हे बघितले. बंगालची जनता माझ्या पाठीशी उभी आहे. भवानीपूरमध्ये 46% बिगर बंगाली मतदारांनी मला मतदान केले आहे. त्यामुळेच माझा विजय झाला आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार मधल्या लोकांना दररोजच्या प्रचार सभांमध्ये नावे ठेवणाऱ्या आणि त्यांच्यावर तोफा डागणाऱ्या ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदार संघात बिगर बंगाली मतदारांना विजयाचे श्रेय देणे यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही. आता भवानीपूर जिंकून त्यांनी स्वतःचे मुख्यमंत्रिपद “सेफ” करून घेतले आहे. त्यांचा डोळा आता दिल्लीवर आहे. त्यामुळे केवळ बंगाली मतदारांवर अवलंबून राहून चालणार नाही. इतर भाषक मतदारांना सुद्धा चुचकारले पाहिजे या हेतूने त्यांनी भवानी पुढच्या विजयाचे श्रेय बिगर बंगाली मतदारांना दिले आहे.
त्यांचे बंधू कार्तिक यांनीदेखील 2024 मध्ये दिल्लीमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार असेल, असा दावा केला आहे. त्यालाच एक प्रकारे ममता बॅनर्जी यांनी बिगर बंगाली मतदारांना आपल्या विजयाचे श्रेय देऊन पुष्टी देण्याचा प्रयत्न केला आहे.
I have won the Bhabanipur Assembly bypolls with a margin of 58,832 votes and have registered the victory in every ward of the constituency: Chief Minister Mamata Banerjee in Kolkata
महत्त्वाच्या बातम्या
- Bhawanipur By-Poll Results : मतमोजणीच्या 11 फेऱ्या पूर्ण; ममता बॅनर्जी 34 हजार मतांनी पुढे, तृणमूलकडून गुलालाची तयारी
- “खोलवर शिरून” बाॅलिवूडला खणती लावायला सुरुवात; बड्या धेंडांना नार्कोटिक्स ब्यूरो सोडणार नाही!!
- “जर मदत दिली नाही तर शेतकरी तुमच्या उरावर बसल्याशिवाय राहणार नाही”, राजू शेट्टी यांचा इशारा्र
- Shivsena Audio clip : रामदास कदमांची ऑडिओ क्लिप खरी की खोटी माहीत नाही, पण शिवसेनेत मोठी खदखद ; नांदेड येथे फडणवीस यांची प्रतिक्रिया
- सामंथा अक्कीनेनी- नागा चैतन्यने घेतला घटस्फोटाचा निर्णय