• Download App
    कॅप्टन अमरिंदर सिंगांचा राहुल गांधी आणि डाव्यांविऱोधात सूर; म्हणाले, जालियानवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरणात गैर काय? नवीन स्मारक चांगलेच दिसतेय|"I don't know what has been removed. To me it looks very nice," says Punjab CM Captain Amarinder Singh over the renovation of the Jallianwala Bagh

    कॅप्टन अमरिंदर सिंगांचा राहुल गांधी आणि डाव्यांविऱोधात सूर; म्हणाले, जालियानवाला बाग स्मारकाच्या नुतनीकरणात गैर काय? नवीन स्मारक चांगलेच दिसतेय

    वृत्तसंस्था

    चंडीगड – भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील एक अध्याय जालियानवाला बाग. या बागेच्या स्मारकाच्या नुतनीकरणाचा समारंभ नुकताच झाला. मात्र, त्यावरून डावे इतिहासकार आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मात्र, याच काँग्रेस पक्षाचे नेते पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग  यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात सूर लावला आहे.”I don’t know what has been removed. To me it looks very nice,” says Punjab CM Captain Amarinder Singh over the renovation of the Jallianwala Bagh

    जालियानवाला बागेतून कोणत्या ऐतिहासिक वस्तु हलविण्यात आलेल्या नाहीत. तेते स्मारक नुतनीकरणानंतर सुंदरच दिसते आहे. त्यामध्ये गैर काय केले, असा सवालच कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. असा सवाल करून त्यांनी एक प्रकारे राहुल गांधी यांच्याच टीकात्मक विधानाला छेद दिला आहे.



    राहुल गांधी म्हणाले होते की मी हुतात्माचा मुलगा आहे – शहीदांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही.  जे स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत ते संघर्ष करणाऱ्या लोकांना समजू शकत नाहीत.

    डावे इतिहासकार प्रो. चमन लाल आणि इरफान हबीब यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारने जालियनवाला बागेच्या इतिहासाला चमजदार (glamorized) बनवण्याचा प्रयत्न केला आहे. तेथे उद्यान बांधून लोकांच्या करमणुकीचे साधन बनवले आहे,

    अशी टीका प्रो. चमनलाल यांनी केली, तर सरकार हे इतिहासाला तोडून मरोडून पेश केले आहे, असे टीकास्त्र इरफान हबीब यांनी सोडले आहे. इतिहासाचे उदात्तीकरण करणे गैर आहे. जो इतिहास घडला तो तसाच मांडला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.

    परंतु, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी जालियानवाला बाग स्मारकातून कोणतीही ऐतिहासिक वस्तू हटविण्यात आली नाही. उलट स्मारकाचे नुतनीकरण केल्यानंतर ते अधिक चांगले दिसत असे उत्तर देऊन काँग्रेस आणि डाव्या पक्षाच्या नेत्यांना आणि विचारवंतांना चांगलेच फटकारले आहे.

    “I don’t know what has been removed. To me it looks very nice,” says Punjab CM Captain Amarinder Singh over the renovation of the Jallianwala Bagh

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!