Sunday, 11 May 2025
  • Download App
    Coronavirus Third Wave : तिसरी लाट कशी रोखणार ? , सर्वोच्च न्यायालयाचा सवाल ; लहान मुलांना कोरोना झाल्यास पालकांनी काय करायचं?।How You are Going to Stop Third Wave of Corona virus. Suprim court asked to a Government

    Coronavirus Third Wave : तिसरी लाट कशी रोखणार ? , सर्वोच्च न्यायालयाचा सवाल ; लहान मुलांना कोरोना झाल्यास पालकांनी काय करायचं?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या तिसरी लाट रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत. दुसरी लाट हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही. तिसऱ्या लाटेसाठीही नाह़ी. या लाटेत हे डॉक्टर, नर्स थकलेले असतील. तेव्हा काय करणार? त्यासाठी भावी डॉक्टर आणि नर्सचा विचार करू शकतो का? देशात 1 लाख डॉक्टर ‘नीट’ परिक्षेच्या प्रतिक्षेत आहेत. अडीच लाख नर्स बसून आहेत. यासाठी सरकारचे नियोजन काय आहे.तातडीने बॅकअप तयार करावा लागेल, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला खडसावले आहे. How You are Going to Stop Third Wave of Corona virus. Suprim court asked to a Government



    देशात कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचे केंद्र सरकारचेच वैज्ञानिक सल्लागार सांगत आहेत. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा झाला तर पालकांनी काय करायचं? ते रुग्णालयात मुलांसोबत राहू शकणार का? अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केंद्र सरकारला केली. तसेच लहान मुलांचेही लसीकरण करण्याचा विचार करावा, अशी महत्वपूर्ण सूचनाही केली.

    राजधानी दिल्लीतील ऑक्सिजन टंचाई आणि देशातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त करून न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने सरकारला प्रश्न विचारले.

    How You are Going to Stop Third Wave of Corona virus. Suprim court asked to a Government

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!