• Download App
    काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल। How will the Congress party split and unite the opposition ?; General Secretary K. C. Venugopal's tough question

    काँग्रेस पक्ष फोडून विरोधी ऐक्य कसे साधणार?; सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांचा परखड सवाल

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : गेल्या काही दिवसातल्या राजकीय ट्रेंड बघितला तर काँग्रेस पक्षातले नेते आणि कार्यकर्ते फुटून तृणमूल काँग्रेस मध्ये जाताना दिसत आहेत. यावर पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी परखड भाष्य केले आहे. How will the Congress party split and unite the opposition ?; General Secretary K. C. Venugopal’s tough question

    काँग्रेस हा देशातला महत्त्वाचा राष्ट्रीय पक्ष आहे केंद्रातल्या भाजपा सरकारशी तो परिणामकारकरित्या टक्कर देतो आहे. पण काँग्रेस पक्ष फोडून काही नेते सर्व विरोधकांचे ऐक्य साधू इच्छितात. यातून खरेच विरोधी ऐक्य साध्य होईल की सत्ताधारी भाजपला त्याचा फायदा होईल याचा विचार करण्याची गरज आहे, असा टोला वेणुगोपाल यांनी तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे नाव न घेता लगावला आहे.

    काँग्रेसने आतापर्यंत संपूर्ण देशात भाजप सरकार विरोधी वातावरण तापवले आहे. विविध ठिकाणी महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसानभरपाई आंदोलन यासारखी आंदोलने करून जनतेला जागृत केले आहे. परंतु काही नेते एकत्र लोंढा करून पक्षाबाहेर पडतात तेव्हा ते भाजपसारख्या आपल्या विरोधी शक्तीलाच आणखी ताकद देत असतात हे त्यांच्या लक्षात येत नाही का?, असा सवाल वेणुगोपाल यांनी केला आहे.



    काँग्रेस पक्ष फोडून कोणत्याही स्थितीत विरोधकांचे ऐक्य साध्य होऊ शकणार नाही कारण सर्व विरोधी पक्षांमध्ये काँग्रेस हाच एकमेव पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. बाकीचे सर्व आपापल्या राज्यापुरते किंवा विभागात पुरते मर्यादित पक्ष आहेत याकडे देखील त्यांनी लक्ष वेधले आहे.

    ममता बॅनर्जी या काँग्रेस पक्ष फोडून त्याचे नेते तृणमूल काँग्रेस मध्ये सामील करून घेत आहेत. याप्रकारे तृणमूल काँग्रेसचा परिवार हा मूळ काँग्रेस पक्षाला पर्याय ठरण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा दिसते आहे. त्यावरच वेणुगोपाल यांनी एक प्रकारे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मात्र हे करताना त्यांनी ममता बॅनर्जी यांचे नाव घेण्याचे टाळले आहे.

    How will the Congress party split and unite the opposition ?; General Secretary K. C. Venugopal’s tough question

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार