विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी लंडन दौऱ्यावरून परवा परत आले. ते काल संसदेत गेले आणि त्यांनी पुन्हा मोदी – अदानी सुरू केले. ते संसदेत पोहोचल्यावर एका मिनिट भरात लोकसभेचे कामकाज स्थगित केल्याचे राहुल गांधींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी सभापतींना भेटून आपल्याला आज लोकसभेत आपले मत मांडू द्यावे, अशी विनंती केली आहे. आता सभापती ती विनंती कशी आणि केव्हा मान्य करतात??, हे आज पाहणे महत्त्वाचे आहे.How can rahul Gandhi increase political capital value of Congress by targeting modi – adani – ambani??, is the real question
पण लोकसभेचे कामकाज स्थगित झाल्यानंतर काल राहुल गांधींनी लगेच पत्रकार परिषद घेऊन पुन्हा मोदी – अदानी संबंध याच विषयावर सरकारला टार्गेट केले. अदानींना संरक्षण खात्याची एवढी मोठी कंत्राटे दिलीच कशी काय??, असे सवाल केले. एकूण राहुल गांधी लंडनमध्ये लोकशाही नसण्याविषयी बोलले, पण भारतात परतल्यानंतर हाताशी उपलब्ध असलेल्या लोकशाहीला अनुसरून मोदी – अदानींवरच घसरले. मूळात हे फिरून फिरून भोपळे चौकात येण्यासारखेच होते. कारण राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेत नवे काहीच नव्हते. मोदी – अदानी संबंध या पलिकडे त्यात विषय नव्हता. बाकी लोकशाही विषयी लंडन मधल्या भाषणावर माफी मागणार नाही वगैरे रूटीन टिपण्या होत्या.
पण मूळात प्रश्न हा आहे, की राहुल गांधी गेले वर्षभर सातत्याने मोदी – अदानी – अंबानी यांना उघडपणे टार्गेट करत असताना मोदींची लोकप्रियता किंवा अदानी – अंबानींचा बिझनेस कमी कसा होत नाही?? अदानींना हिंडेनबर्ग रिपोर्ट मुळे बसलेला फटका हा भाग आंतरराष्ट्रीय टूलकिटचा भाग होता आणि राहुल गांधी हे त्यातले एक घटक होते, हे लक्षात घेऊन, अदानींचा बिझनेस पूर्ण झोपला नाही हे डोळे उघडून नीट समजून घ्यावे लागेल. मग राहुल गांधींनी मोदी – अदानी – अंबानी यांना टार्गेट करून मिळवले तरी काय??, हा प्रश्न खरा आहे आणि या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या घसरलेल्या राजकीय भांडवल मूल्यात दडले आहे.
काँग्रेस ज्यावेळी पूर्णपणे देशाच्या सत्तेवर काबीज होती, त्यावेळी कोणत्या उद्योगपतीला आजच्यासारखे टार्गेट केले होते का?? अगदी इंदिरा गांधी, राजीव गांधींच्या काळात धीरूभाई अंबानींचा उदय झाला. ते त्यावेळी काँग्रेसजरांच्या गळ्यातले ताईत होते ना?? त्यांच्याविषयी त्यावेळी एकातरी काँग्रेस नेत्याने तोंड उघडले होते का?? मग आता असे काय झाले आहे, की राहुल गांधी यांच्यासारखे नेते सातत्याने मोदी – अदानी – अंबानी यांना टार्गेट करत आहेत आणि काँग्रेस नेते राहुल गांधींना फॉलो करत सत्तेवर आल्यानंतर अदानी – अंबानींची जागा तुरुंगात असेल असे म्हणत आहेत??
याचा संबंध काँग्रेसच्या राजकीय भांडवल मूल्याशी संबंधित आहे. राहुल गांधींनी वारंवार टार्गेट करूनही मोदींच्या लोकप्रियतेत फरक पडत नाही. अदानी – अंबानींचा बिजनेस कमी होत नाही. पण काँग्रेसच्या देणग्या मात्र घटल्या आहेत. हे काँग्रेसचे राजकीय भांडवल मूल्य कमी झाल्याचे निदर्शक आहे. एक प्रकारे काँग्रेसची पॉलिटिकल न्यूसन्स व्हॅल्यू संपत आल्याचे ते निदर्शक आहे. राहुल गांधींना काय आरडाओरडा करायचा ते करू देत, त्याने आपल्याला काही फरक पडत नाही हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सूचकपणे अनेकदा दाखवून दिलेच आहे. पण अदानी – अंबानी यांच्यासारखे उद्योगपती देखील आता न बोलता तेच करत आहेत. त्यांच्यापैकी कोणताही उद्योगपती काँग्रेस जणांच्या कुठल्याच आरोपाला उत्तर द्यायला देखील पुढे येत नाही. एक प्रकारे काँग्रेस जणांच्या तोफा मोदी – अदानी – अंबानींच्या वाड्यावर किती धडकल्या तरी, ना त्यांचा चिरा ढासळतो आहे, ना त्याच्या दरवाजाला काही नुकसान पोहोचते आहे!! हेच काँग्रेसचे खऱ्या अर्थाने राजकीय भांडवली मूल्य घसरल्याचे निदर्शक आहे.
राहुल गांधी आज सभापतींनी परवानगी दिल्यानंतर लोकसभेत बोलतील. ते काही आरोप करतीलही. लोकशाहीच्या उपलब्ध स्वातंत्र्यानुसार तो त्यांचा अधिकार ते वापरतीलही, पण म्हणून काँग्रेसचे घसरलेले राजकीय भांडवली मूल्य त्यातून वाढून मोदी – अदानी – अंबानी यांना काही फरक पडेल का??, हा मूलभूत प्रश्न कायम आहे!!
How can rahul Gandhi increase political capital value of Congress by targeting modi – adani – ambani??, is the real question
महत्वाच्या बातम्या
- Coronavirus : करोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने पाठवले सहा राज्यांना पत्र!
- योगी सरकराच्या सहा वर्षांमध्ये उत्तर प्रदेशात ६३ गुन्हेगारांचा खात्मा; ५ हजारांहून अधिकांच्या मुसक्या आवळल्या!
- पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात देशात आरोग्य सुविधांचा झपाट्याने विकास; ‘AIIMS’ ची संख्या २२ वर पोहचली!
- शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात लाँग मार्च मुंबईत धडकण्याआधीच सकारात्मक निर्णय